विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी यूडीआयडी व आधार संलग्नीकरण तात्काळ करण्याचे आवाहन; अन्यथा मानधन होणार बंद
Divyang Yojana 2026
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनांनुसार विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड संलग्नीकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले वैश्विक ओळखपत्र (UDID Card), आधार कार्ड तसेच बँक खात्याची छायांकित प्रत तात्काळ संगणकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावी.
राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येत आहेत.
या योजनांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचाही समावेश असून, अलीकडे ‘युडीआयडी’ कार्ड अनिवार्य करण्यात आल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान थांबले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत, १ एप्रिल २०२६ पूर्वी या योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना मुदतवाढ दिली आहे. संबंधित तहसीलदारांनी जुन्या वैद्यकीय प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वैश्विक ओळखपत्र कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
UDID Card eKYC Online Marathi | UDID Card Update Process 2026
या आदेशाचे पालन न करता संबंधित कागदपत्रे सादर न केल्यास होणाऱ्या गैरसोयीस तसेच अनुदान बंद झाल्यास संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
तरी सर्व संबंधित दिव्यांग बांधवांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून योजनांचा लाभ अखंडित ठेवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे