लाडकी बहीण योजना शासनाचा नवा शासन निर्णय; kyc दुरुस्ती साठी संधी
Ladki Bahin GR
नव्या शासन निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एक संधी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने महिला व बाल विकास विभागास प्राप्त झाली आहेत.
सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आलेली आहे.
शासन निर्णय 👇🏻👇🏻
या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग काम करत आहे.
सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आपली kyc पूर्ण करण्याचे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.