राशन कार्ड संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय ! राज्यात Smart Shidhapatrika

राशन कार्ड संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय ! राज्यात स्मार्ट शिधापत्रिका

Smart Shidhapatrika

राज्य शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत AAY PHH सह APL केशरी शेतकरी शिधापत्रिका संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता राज्यातील सर्व जुनी राशन कार्ड बदलून त्याऐवजी स्मार्ट शिधापत्रिका मिळणार.

या उपक्रमाला मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये विभागाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे. 


नागरिकांना जुन्या शिधापत्रिका हाताळण्यास अवघड व कागदी असल्याने रेशनकार्ड फाटण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे परिणामी या शिधापत्रिका वारंवार बदलाव्या लागतात.

या अनुषंगाने आता राज्यातील नागरीकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 राज्यात नव्याने दिल्या जाणाऱ्या या सर्व शिधापत्रिका धारकांना नवीन QR कोड सह स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील.

नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचे दि.१२.०८.२०२५ रोजीच्या मत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकास समितीसमोर दि.२१.११.२०२५ रोजीच्या बैठकीमध्ये स्मार्ट शिधापत्रिका वितरीत करण्याचा प्रस्ताव (RFP) सादर करण्यात आला.

राज्य शासनाने आता या स्मार्ट शिधापत्रिका प्रकल्प राबविण्यास व त्याकरीता येणाऱ्या खर्चास मान्यता दिली आहे. 

या मान्यतेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (AAY व PHH) व APL-शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार.

हा प्रकल्प राबविण्यास 51.69 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

ही प्रक्रिया टेंडर प्रक्रिये द्वारे राबवली जाणार आहे. लवकरच टेंडर काढून या अभियानाद्वारे नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

GR PDF 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील नागरीकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map