नागरिकांना आता घरबसल्या आधारशी संलग्न मोबाइल पडताळणी करण्याची सुविधा | AADHAR Update 2023

नागरिकांना आता घरबसल्या आधारशी संलग्न मोबाइल पडताळणी करण्याची सुविधा

Verify mobile number with Aadhaar

AADHAR Update 2023


वापरकर्त्याचे फायदे लक्षात घेऊनभारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने नागरिकांना  आधारशी संलग्न ईमेल/मोबाइल क्रमांकाची पडताळणी करण्याची परवानगी दिली आहे.

Link mobile number with aadharभारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाला असे आढळून आले की काही प्रकरणांमध्ये नागरिकांना  त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक त्यांच्या आधारशी जोडला आहे याबद्दल माहिती किंवा खात्री नव्हती. त्यामुळे आधार ओटीपी दुसऱ्या कुठल्यातरी मोबाईल क्रमांकावर जात असल्याची भीती नागरिकांना वाटत होती. आता या सुविधेमुळे नागरिकांना अगदी सहजपणे हे तपासता येईल.

अधिकृत संकेतस्थळावर (https://myaadhaar.uidai.gov.in/किंवा mAadhaar ऍपद्वारे  ‘'व्हेरिफाय ईमेल /मोबाईल नंबर '  शीर्षकाखाली ही  सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांना त्यांचा स्वतःचा ईमेल/मोबाईल क्रमांक संबंधित आधारशी जोडलेला आहे की नाही याची  पडताळणी करण्यासाठी हे विकसित केले आहे.

ही सुविधा नागरिकांना खात्री पटवून देते की त्याच्या/तिच्या माहितीनुसार ईमेल/मोबाईल क्रमांक संबंधित आधारशी जोडलेला आहे. तसेच एखादा  विशिष्ट मोबाइल क्रमांक संलग्न नसल्यास तसे नागरिकांना सूचित करते आणि नागरिकांची इच्छा असल्यासमोबाइल क्रमांक  अपडेट करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची सूचना करते.

जर मोबाईल क्रमांकाची आधीच पडताळणी झाली असेल तर नागरिकांना  त्यांच्या स्क्रीनवर , ‘तुम्ही प्रविष्ट केलेला  मोबाइल क्रमांक आमच्या नोंदीशी यापूर्वीच पडताळून पाहण्यात आला  आहे’ असा संदेश दिसेल.

जर नागरिकांना नावनोंदणी दरम्यान दिलेला मोबाईल क्रमांक आठवत नसेलतर  Myadhaar पोर्टल किंवा mAadhaar ऍपवर  Verify Aadhaar शीर्षकावर मोबाईल क्रमांकाचे  शेवटचे तीन अंक तपासून पाहता येतील.

जर नागरिकांची   ईमेल/मोबाइल क्रमांक आधारशी जोडण्याची इच्छा  असेल किंवा तिला/त्याचा ईमेल/मोबाइल क्रमांक अपडेट करायचा  असेलतर ती/तो जवळच्या आधार केंद्राला भेट देऊ शकतो.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने (आयपीपीबी) आज जाहीर केले, की त्यांनी भारतीय विशिष्ट ओळखपत्र सेवा (यूआयडीएआय) यात पंजीकरण करण्यासाठी  आधारकार्डावर मोबाइल नंबर अद्ययावत करण्यासाठी एक सेवा सुरू केली आहे.


आता रहिवासी आधारधारक त्याच्या घराच्या पत्त्यावर पोस्टमनद्वारे आपला मोबाइल नंबर आधारमध्ये अद्ययावत करू शकतो. ही सुविधा 650 आयपीपीबी शाखा आणि 146,000 पोस्टमन तसेच स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक उपकरणांनी युक्त ग्रामीण डाक सेवकांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे उपलब्ध होईल.


मोबाइल नंबर अपडेट सुविधा,ही  यूआयडीएआय द्वारा विकसित 'चाइल्ड एनरोलमेंट लाइट क्लायंट (सीईएलसी)' या अनुप्रयोगाचा एक भाग आहे. सीईएलसी सेवांतर्गत नागरिक आपला मोबाईल क्रमांक त्याला जोडून / अद्ययावत करु शकतात आणि आधार जारी करण्यासाठी 5 वर्षाखालील मुलांची  देखील आधार नोंदणी करू शकतात. सध्या, आयपीपीबी केवळ मोबाइल अद्ययावत सेवा प्रदान करीत आहे आणि लवकरच आपल्या नेटवर्कद्वारे मुलाची नावनोंदणी सेवा देखील सक्षम करेल.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) ही भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या 100% मालकीसह टपाल विभाग, अंतर्गत स्थापन केली गेलेली बँक आहे.

आयपीपीबीचे  मूलभूत ध्येय म्हणजे विनासायास  आणि भौगोलिक अडथळे दूर करत 155,000 टपाल कार्यालये (ग्रामीण भागात 135,000 तसेच   300,000 लाख टपाल कर्मचाऱ्यांसह  शेवटच्या रहिवाशी टप्प्यापर्यंत पोहोचणे.