मृत जनावराच्या नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज | MH pashu aarogya 2023

लम्पी नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध 

MH pashu aarogya 2023

सर्व पशुपालक शेतक-यांनी लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईसाठी संकेतस्थळ आणि गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल अँपवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन पशु संवर्धन विभागाने केले आहे. 

पशुपालकांसाठी  www.mhpashuaarogya.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.

याच बरोबर Google play स्टोअरवर पशुसहायता (PASHU SAHAYATA) हे मोबाईल अँप तयार करण्यांत आले आहे. 

Watch how to apply on mhpashuaarogya लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशुपालकांनी या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज करताना पशुपालकांनी स्वतःच्या मोबाईलचा वापर करावा. 

नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. 

त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये, असे आवाहन पशु संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.