आता घरबसल्या जीवन प्रमाणपत्र, देशभर प्रचार मोहीम | jeevan pramaan face app

आता घरबसल्या जीवन प्रमाणपत्र, देशभर प्रचार मोहीम

jeevan pramaan face app


1 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण 29 लाख 29,986 डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) जारी करण्यात आले होते. यापैकी एकूण 1 लाख 52 हजार 172 निवृत्तीवेतन धारकांनी फेस ऑथेंटिकेशनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेटचा पर्याय निवडला आहे. 

डीएलसी निवडणाऱ्या केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांची संख्या 11 लाख 95 हजार 594 आहे, त्यापैकी 96,099 केन्द्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांनी फेस ऑथेंटिकेशनद्वारे डीएलसीची निवड केली आहे.

यापूर्वी जीवन प्रमाणपत्र प्रत्यक्ष स्वरूपात सादर करावे लागत होते आणि त्यासाठी वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना तासनतास बँकांबाहेर रांगेत उभे राहावे लागत होते. आता घरबसल्या एका बटणाच्या क्लिकवर जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले आहे. 

मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे प्रथमच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत, आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक आणि बँक/पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक यासंबंधीचे तपशील आवश्यक आहेत. ही सुविधा राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात वितरण प्राधिकरणासाठी देखील उपलब्ध आहे.

निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW)  सर्व निवृत्तीवेतनधारकांना विभागाच्या DOPPW_INDIA OFFICIAL,  या अधिकृत  यू ट्यूब  वाहिनीला भेट देण्याची विनंती केली आहे, जिथे साध्या भाषेत चेहरा प्रमाणीकरण तंत्राद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया स्पष्ट करणारे दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने  सर्व पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून सादर करण्यासाठी केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले आहे.