महाप्रितकडून सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन | Biomass Stove subsidy 2022

महाप्रितकडून मोफत सुधारित निर्धूर चूल, अर्ज सुरु 

Biomass Stove subsidy 2022

निर्धुर चूलीचे मोफत वाटप महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कडून राज्यात करण्यात येणार आहे.  राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांनी मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे.

पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत. रहिवाशी अनुसूचित जातीचा असावा, गरिबी रेषेखाली असावा आणि एलपीजी  गॅस कनेक्शन नसावे.

सर्व जिल्ह्यातील इच्छूक रहिवाश्यांनी दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा.

अधिक माहितीसाठी https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.