महत्वाच्या चारही महामंडळांच्या भागभांडवलात वाढ; लाभार्थी संख्या वाढणार | MPBCDC Loan Scheme 2022

महत्वाच्या चारही महामंडळांच्या भागभांडवलात वाढ; लाभार्थी संख्या वाढणार 

MPBCDC Loan Scheme 2022

28 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 4 महामंडळाचे भागभांडवल वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी होत असून, राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.

GR LINK 

👇

सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या., संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या., महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. या चार महामंडळांच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करणेबाबत.


MPBCDC Loan Scheme 2022


या शासन निर्णयानुसार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल पूर्वी 500 कोटी होते, ते वाढवून एक हजार कोटी करण्यात आले आहे. 

त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल 73 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी, 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल 300 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी  करण्यात आले आहे. 

तर राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींवरून दहा पटीने वाढवून 500 कोटी करण्यात आले आहे.

महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी राज्य सरकारने भरभरून निधी दिला असून अतिरिक्त निधी टप्प्याटप्प्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. 

या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

#MPBCDC_Loan_scheme_2022