Ladki Bahin EKYC लाडक्या बहिणींना पुन्हा EKYC दुरुस्ती ची संधी

लाडक्या बहिणींना पुन्हा EKYC दुरुस्ती ची संधी

Ladki Bahin EKyc 

E-KYC सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत Aadhaar Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे.

लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.


त्यानुसार शासनाने या बाबीचा सकारात्मक विचार करून, ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत E-KYC पूर्ण केली आहे आणि पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीची नोंद केली आहे, अशांसाठी ऑनलाईन E-KYC मध्ये सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 मार्चपर्यंत उपलब्ध करून दिली आहे.

यासंदर्भात योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक सुधारणा करण्यात आली असून, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही.



शासन परिपत्रक जारी 

शासन निर्णय PDF LINK 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026