शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी खत खरेदी करण्याचे आवाहन |Fertilizer for kharip

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी खत
 खरेदी करण्याचे आवाहन

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक खत बाजारात खत तुटवडा होण्याची शक्यता असून खताच्या किमती वाढण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खताचा पुरेसा साठा करुन ठेवावा. यामुळे ऐन खरीप हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील युध्दजन्य परिस्थितीमुळे जागतिक खत बाजारात रासायनिक खत तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खताच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सद्या बाजारात पुरेशा प्रमाणात खत साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा आवश्यक साठा करुन ठेवावा.
भारत सर्वाधिक खतांची आयात करणारा देश असून युध्दजन्य परिस्थितीत देशात ऐन खरीप हंगामात रासायनिक खताची टंचाई भासू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ताच शक्य असेल तेवढी खत खरेदी करुन ठेवण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.