बांधकाम कामगार नोंदणी माहिती || bandhkam kamgar nondani online

bandhkam kamgar nondani online कशी करावी , कोणत्या योजनांचा लाभ मिळतो पाहूया सविस्तर. 

पहा कशी करायची बांधकाम कामगार नोंदणी, बांधकाम कामगारासाठी असलेल्या  योजनाची  माहिती

bandhkam kamgar nondani online 

bandhkam kamgar nondani

bandhkam kamgar nondani

mahabocw worker registration & schemes

न २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. तथापी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख इतकी अपेक्षित आहे.

बांधकाम नोंदणी ऑनलाईन कशी करावी पहा खालील विडिओ मध्ये


bandhkam kamgar nondani नोंदणी पात्रता निकष


  1. १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
  1. मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार

bandhkam kamgar nondani नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे


  1. वयाचा पुरावा
  2. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  3. रहिवासी पुरावा
  4. ओळखपत्र पुरावा
  5. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो 
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…

बांधकाम कामगार नोंदणीसाठी खालील काम करणारे कामगार पात्र असतील. 

“बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…

  • इमारती,
  • रस्त्यावर,
  • रस्ते,
  • रेल्वे,
  • ट्रामवेज
  • एअरफील्ड,
  • सिंचन,
  • ड्रेनेज,
  • तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
  • स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
  • निर्मिती,
  • पारेषण आणि पॉवर वितरण,
  • पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
  • तेल आणि गॅसची स्थापना,
  • इलेक्ट्रिक लाईन्स,
  • वायरलेस,
  • रेडिओ,
  • दूरदर्शन,
  • दूरध्वनी,
  • टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
  • डॅम
  • नद्या,
  • रक्षक,
  • पाणीपुरवठा,
  • टनेल,
  • पुल,
  • पदवीधर,
  • जलविद्युत,
  • पाइपलाइन,
  • टावर्स,
  • कूलिंग टॉवर्स
  • ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
  • दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
  • लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
  • रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
  • गटार व नळजोडणीची कामे.,
  • वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
  • अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  • वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  • उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
  • सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
  • लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
  • जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
  • सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
  • काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
  • कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
  • सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
  • स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
  • सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
  • जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
  • माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
  • रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
  • सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.



नोंदणी फी- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/- (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी रु.1/-

ऑफलाईन अर्जाचा नमुना mahabocw worker registration offline form खालील लिंक वर मिळेल

Mahabocw worker registration offline form


बांधकाम कामगार योजना चा अर्ज कसा करायचा हे देखील पहा

👇




Bandhkam Kamgar Yojana शैक्षणिक योजना 

  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रू.२५००/- किंवा इ.८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रू.५०००
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रू.१०,०००/-.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.१०,०००/-.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रू. २०,०००/-.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.६०,०००/-
  • नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रू.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रू.२५,०००/- 
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती.

Bandhkam Kamgar Yojana आरोग्य योजना


  • नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/- 
  • नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच) 
  • पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत १८ वर्षापर्यंत रू.१,००,००० मुदत बंद ठेव
  • नोंदीत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रू.२,००,०००/- अर्थसहाय्य 
  • नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना

Bandhkam Kamgar Yojana अर्थसहाय्य योजना

  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/-.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२,००,०००/-
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू. १०,०००/-. 
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता) ,(प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील).

Bandhkam Kamgar Yojana सामाजिक सुरक्षा योजना

  • नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,०००/-. 
  • व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप. 
  • नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता रू.५०००/-. अर्थसहाय्य 
  • नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.  
  • नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. 
  • नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना.