कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये | COVID relief for children

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये

COVID relief for children 

Relief for childrenपात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन

 

कोविड-19 आजाराने एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन महिला बालविकास विभागाने केले आहे.

 मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकीर्ण प्रकरण  377/2018 (श्वेता ता दणाणे वि केंद्र शासन व इतर) मध्ये 20 ऑक्टोंबर,2021 रोजी देण्यात आलेले आदेशान्वये मा. सर्वाच्च न्यायालयाने महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.


अर्थ सहाय्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

१) मुळ विहित नमुन्यातील अर्ज 
२) बालकाचे शाळेचे बोनाफाईड, 
३) आई-वडील कोविड -19 ने मुत्यृ झाल्याचा दाखला व झेरॉक्स प्रत, 
४) बालकाचे अथवा बालकांच्या पालकांचे संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते आधार संलग्न असल्याबाबत  पासबुक झेरॉक्स प्रत, 
५) बालकाचे आधार कार्ड, 
६) शासनाच्या किंवा इतर योजनाचा लाभ घेत नसल्याचे हमीपत्र असे आवश्यक आहे. 
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, यांच्याशी संपर्क साधावा.

अर्जाचा नमुना 
Relief for children

पात्र लाभार्थी यांनी आपले तालुक्यातील 

1) तहसीलदार सर्व तालुके  

2)एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सर्व तालुके  

3)जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अर्जाचा विहित नमुना घेऊन आवश्यक कागदपत्रासह व मुळ अर्जासह प्रस्ताव वरील या तीन कार्यालयापैकी एका कार्यालयास जमा करावे,

अधिका माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,  येथे संपर्क साधावा,