मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन लवकरच भूसंपादन || Mumbai Hyderabad bullet train project

मुंबई – हैदराबाद ही बुलेट ट्रेन सोलापूरमार्गे सुरू करण्याचे नियोजित असून याबाबत सर्व्हे झाला आहे. 

पुढील पंधरा दिवसानंतर बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून याविषयीची त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. भूसंपादनाबाबत हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून प्रस्ताव आल्यानंतर तत्काळ त्याचे काम पूर्ण करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली उभारणीनंतर बुलेट ट्रेनच्या उभारणीनंतर होणाऱ्या पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करण्यासाठी जनसुनावणी झाली. यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, प्रांताधिकारी हेमंत निकम, भूमिअभिलेख विभागाचे अधीक्षक हेमंत सानप, अपर्णा कांबळे, कल्याण जाधव आदी उपस्थित होते.

नियोजित मुंबई-हैदराबाद बुलेट (हायस्पीड) ट्रेन सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून जाणार आहे. या सहा तालुक्यांतील ७८४ एकर जमीन भूसंपादित होणार असून, ग्रामीणसाठी मूल्यांकनापेक्षा पाच पट जास्त, तर शहरासाठी अडीच पट जास्त मोबदला मिळणार असल्याची माहिती झालेल्या जनसुनावणी दरम्यान देण्यात आली.
यावेळी उपस्थित रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून संंबंधित हायस्पीड बुलेट ट्रेनसंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली. प्रास्ताविक अपर्णा कांबळे यांनी केले. त्यानंतर पीपीटीद्वारे बुलेट ट्रेनसंदर्भातील सर्व माहिती, जमीन भूसंपादन, कालावधी, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

मुंबई हैद्राबाद हायस्पीड ट्रेनच्या high speed train route या नव्या मार्गासाठी १७.५ मीटर रुंद जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. 

यात सर्वाधिक जमीन ही पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील बाधित होणार असून, शेतकऱ्यांना बाधित जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार नसल्याचे ही यावेळी सांगण्यात आले. 
असा असनार आहे मुंबई हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प
Mumbai Hyderabad bullet train project

 * मुंबई-हैदराबाद मार्ग - ६४९ किलोमीटर

* स्थानके - सोलापूर अन् पंढरपूर

* ट्रेनची क्षमता - ७५० प्रवासी

* १० X १० च कोच

* ताशी ३०० किलोमीटर वेग

या मुंबई-हैदराबाद हायस्पीड ट्रेनच्या प्रकल्प प्राथमिक स्तरावरून समजावून घेतला गेला आहे.
 अंतिम अहवाल लवकरच तयार होईल.
 हे काम लवकरात लवकर होण्यासाठी, सोलापूरच्या विकासासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार आहे अशी माहिती यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, सोलापूर लोकसभा मतदारसंघ यांनी दिली.


मुंबई ते हैदराबाद या बुलेट ट्रेनचा एकूण ६४९.७६ किलोमीटर मार्ग असणार आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातून १७० किलोमीटर मार्ग जाणार आहे. त्यासाठी माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या सहा तालुक्यातील ६२ गावांतून ही बुलेट ट्रेन जाणार आहे. त्यासाठी ३१७.९७ हेक्टर जमिनीचे संपादन खासगी वाटाघाटी किंवा नव्या भूसंपादन कायद्यानुसार( land acquisition act ) होईल.

सद्यःस्थितीत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून त्यासाठीचा डीपीआर तयार करण्यात येत आहे. 
हा प्रकल्प होण्यास साधारणत: दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे.
या हायस्पीड रेलकडून भूसंपादनाचा प्रस्ताव आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे भूसंपादन विभागाच्या समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी सांगितले.