शेळी गट वाटप योजनेसाठी अर्ज सुरू, कडबा कुट्टीला ५०% अनुदान | sheli gat vatap yojana 2022

शेळी गट वाटप योजनेसाठी अर्ज सुरू, कडबा कुट्टीला ५०% अनुदान

sheli gat vatap yojana 2022


जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अनुदानावर विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेवून पशुपालकांनी आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परिषद सेसफंडामधून 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये 2 शेळ्यांचे युनिट विधवा / परितक्त्या / दारिद्रय रेषेखालील महिला व निराधार महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेसाठी र.रु. 12 हजार 400 एवढी अनुदान मर्यादा निश्चित केलेली आहे.

जिल्हा परिषद सेसफंडामधून अनुदानावर कडबाकुट्टी मशिनचा पुरवठा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी विहित मापदंडाच्या कडबाकुट्टी मशीन खुल्या बाजारातून खरेदी केल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने 50 टक्के अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध असून लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव दि. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पंचायत समिती स्तरावर स्विकारण्यात येणार आहेत. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत करण्यात आले आहे.