असा असेल सुरत चेन्नई महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map

असा असेल सुरत चेन्नई महामार्ग 

Surat - Chennai Greenfield expressway Route map

Surat - Chennai Greenfield expressway

Surat - Chennai Greenfield expressway nhai



देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून भारतमाला या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. 

तब्बल सात लाख कोटी रुपये खर्चून राबवली जाणारी ही भव्य योजना आहे. देशातील विविध टोके महामार्गाद्वारे जवळ आणून ठेवणे आणि विकासाच्या चक्राला गती देण्याचे त्यात प्रस्तावित आहे.


 

या योजनेत महाराष्ट्र राज्याला एकूण ११ महामार्ग लाभणार आहेत. देशातील एकूण ४४ आर्थिक कॉरिडॉरमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी तीन कॉरिडॉर आहेत. मुंबई-कोलकाता, मुंबई-आग्रा आणि सुरत-नागपूर या तीन कॉरिडॉरमुळे उत्तर महाराष्ट्रात प्रगतीशील महामार्ग होणार आहेत.तर या च भारतमाला योजनेअंतर्गत  सुरत-चेन्नई हा महामार्गही ( Surat - Chennai Greenfield expressway )  प्रस्तावित आहे.

भारतमाला योजनेअंतर्गत केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाच्या वतीने 'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे' उभारण्यात येणार आहे. सुरत-नाशिक- अहमदनगर -सोलापूर-हैद्राबादमार्गे थेट चेन्नईला जाणे शक्य होणार आहे. 

'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे' Surat - Chennai Greenfield expressway ) या नव्या महामार्गामुळे सुरत वरून चेन्नईला अवघ्या बारा तासांत पोहोचता येईल. सध्या असलेले सुरत व चेन्नई मधील १६०० किलोमीटर च अंतर हे केवळ १२७१ किलोमीटर होणार आहे. 

या व्यतिरिक्त वाहनांना होणारी विनाकारण मुंबई पुणे शहरांची वारी कमी होणार आहे तर मुंबई पुणे सारख्या शहरात दररोज ५०,००० वाहनांची दाटी कमी होण्यास या महामार्गामुळे मदत होणार आहे. 

एकूण १२७१ किलोमीटर चा असलेला 'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे' हा महामार्ग सुरत ते सोलापूर एकूण ५६४ किलोमीटर व सोलापूर ते चेन्नई एकूण ७०७ किलोमीटर अशा दोन भागात विभागाला आहे. 

'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे' Surat - Chennai Greenfield expressway ) हा महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक , अहमदनगर , बीड, उस्मानाबाद, सोलापूर या ५ जिल्ह्यातून जाणार आहे. 

'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे' Surat - Chennai Greenfield expressway )  हा महामार्ग ६ पदरी नियोजित असून याची रुंदी ७० मीटर असले मात्र महामार्गाची जमीन अधिग्रण हे १०० मीटर साठी होईल. 

साधारणपणे डिसेंबर २०२५ पर्यंत हा रास्ता बांधून पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. यातील सुरत नाशिक अहमदनगर या २९०.७० किलोमीटर च्या पहिल्या टप्प्यासाठी DPRतयार आहे. 

'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे'Surat - Chennai Greenfield expressway )  हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून १२२ किलोमीटर जाणार आहे यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा - पेठ - दिंडोरी - नाशिक - निफाड - सिन्नर  तालुक्यातील तब्बल ६९ गावातील ९९६ हेक्टर जमीन बाधित होणार आहे, अधिग्रहण होणार आहे. 

हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील  बेंडवळ या गावातून सुरु होऊन बहुडा, दुधवळ, गहाळे, रक्षाभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ. दिंडोरी : तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहूर. पेठ : पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव. नाशिक : आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव. निफाड : चेहेडी खुर्द, चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी. सिन्नर : देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी या गावातून पुढे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करेल. 

route map
image credit enviorment clearance dept


नाशिक जिल्ह्यामध्ये या महामार्गाची जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरु झाली आहे मात्र वाटल्या जाणाऱ्या मोबदल्यावरून शेतकरी व प्रशासन यात विरोध सुरु आहे. 

पुढे 'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे' Surat - Chennai Greenfield expressway ) महामार्ग नाशिक जिल्ह्यातुन अहमदनगर जिल्यात प्रवेश करेल.  अहमदनगर जिल्यातील एकूण ९८.५ किलोमीटर अंतर कापून संगमनेर, राहाता, राहुरी व नगर या चार तालुक्यातून महामार्ग जाणार. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ४९ गावातील ८५० हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. तर वांबोरी घाटात ३० ते ४० मीटर उंचीचे खांब उभारून महामार्ग जाणार.

Watch this also.

👇

राष्ट्रीय/ राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याची कार्यपद्धत निश्चित, GR आला; रकमेत होणार घट 




'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे' Surat - Chennai Greenfield expressway )  महामार्गासाठी  संगमनेर तालुक्यातील १८, राहता तालुक्यातील ५, राहुरीतील २४ व नगर तालुक्यातील ९ गावातील ८५० हेक्टरचे संपादन केले जाणार आहे. 



हा महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोली गुरव ,तळेगाव, वडझरी , कासारे , लोहारे, गोगलगाव, सदतपूर , हसनपूर, सोनगाव राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्गे— खडांबे वांबोरी मांजरसुम्भा  पुढे नगर शहराजवळील चांदबीबी महालाजवळून बरदरी सोनेवाडी पारेवाडी, पारगाव भातोडी, भातोडी पारगाव, चिंचोडी पाटील आठवड मधून पुढे आष्टी जिल्हा बीड मध्ये प्रवेश करेल.


यामध्ये यामध्ये आष्टी तालुक्यातील नांदुर, वाघळूज, बालेवाडी, कुंभेफळ, चिंचोली, शिरपूर, टाकळ  अमिया, नायगाव चोऊभा, केळसांगवी, धिरडी, इमानगाव, चिखली, खानापूर, वाळुंज, पारगाव जोगेश्वरी, वाळुंज या गावातून पुढे जामखेड तालुक्यात प्रवेश करेल.



जामखेड तालुक्यातील डोणगाव, पाटोदा, अरणगाव, खामगाव, दिसलेवाडी खांडवी  बावी राजेवाडी नान्नज पोतेवाडी चोभेवाडी मार्गे पुढे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात जाईल. 


नगर जिल्ह्यातून 100 किलोमीटरचा हा हायवे असणार आहे. यात, संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर तालुक्यातील गावांमधून हा मार्ग जाणार आहे. 

संगमनेर तालुक्यातील 13 गावांची 282 हेक्टर जमीन, राहाता तालुक्यातील 5 गावांमधील 94 हेक्टर, राहुरी तालुक्याच्या 19 गावांतील 428 हेक्टर आणि नगर तालुक्यातील 10 गावांची 256 हेक्टर अशी साधारणतः 1061 हेक्टर, तसेच इंटरचेंजसाठी 125 हेक्टर आणि अतिरीक्त 10 अशी एकूण 1200 हेक्टर जमिनीचे या मार्गासाठी संपादन केली जाणार आहे. 

भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी केंद्र सरकारने अंदाजे 1020 कोटींची तरतूद केलेली आहे. 

पुढे 'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे'  महामार्ग अहमदनगर  जिल्ह्यातुन उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करेल. या महामार्गामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा व तुळजापूर या दोन तालुक्यातील साधारण पाने ३५ गावे बाधित होणार असून या गावातील जमिनीचे अधिग्रहण करण्यात येईल. 

ज्यात परांडा तालुक्यातील चिन्चपूर BK , सक्करवाडी , पांढरेवाडी , उन्देगाव, चिंचपूर kh , रत्नापूर, मलकापूर , आणला, रोहकाल, पिस्टमवाडी, शकत, कुंभेफळ, जाके पिंपरी, अरणगाव, टाकली , राजुरी , वाडी राजुरी , घारगाव, जवळा, कांदळगाव, सिरसावं , हिंगणगाव च्या शिवारातून हा महामार्ग पुढे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात प्रवेश करेल. आणि पुन्हा तुळजापूर तालुक्यातील खुट्टेवाडी येथे उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढे काटी , सावरगाव, सांगावी काटी , सुरतगाव , पिंपळ BK व KH , देवकुर्ली , काटगाव , घाटेवाडी , खडकी शिवाजीनगर, धोत्री मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. 



'सुरत ते चेन्नई ग्रीन कॉरिडॉर एक्स्प्रेस वे'हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या चार तालुक्यातील ५९ गावातून 151 किलोमीटरचा जाणार आहे. 

 सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर साठी येणाऱ्या गावातील जमिनी बाबत येत्या आठवड्यात गॅझेट प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर तीन याची सूचना प्रसिद्धी करण्यात येणार आहे. गट क्रमांक निश्चित झाल्यावर संयुक्त मोजणी होईल त्यानंतर अंतिम टप्प्यात म्हणून अंतिम जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रसिद्धी करण्यात येणार आहे. 

यासाठी किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती या महामार्गाची नेमण्यात आलेल्या भुस्मपादन अधिकारी अरुणा गायकवाड यांनी दिली आहे. 

यामध्ये अंदाजित बालेवाडी , कव्हा , दारशिंगे ,पानगाव , लक्ष्याची वाडी , नागोबाची वाडी ,कासारवाडी, अलीपूर, उपळाई , उन्देगाव , काळेगाव , मानेगाव, सासुरें, वारेगाव, रत्नगाव, सर्जापूर , हिंगणी, चिंचखोपण , तरडगाव, मार्डी , करंबा , गुळवंची , बाणेगाव , खेड, कासेगाव , उळे , बोरामणी, तांदुळवाडी, सांगदारी , मुष्टी दर्गाहल्ली, धोत्री , कुंभारी , तीर्थ , येत्नाल , फाटाटेवाडी , होटगी, हत्तूर, घोडतांडा  , माद्रे , चपळगाववाडी , दहिटणेवाडी , कोणहल्ली , हासपूर , नागणहल्ली, बोरगाव , डोंबारजवळगे  , ब्रहमपूर , चपळगाव , उमार्गे, मैंदर्गी ग्रामीण, नागोरे इत्यादी गावांचा समावेश होण्याची शक्यात आहे मात्र अंतिम यादी हे जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच प्रकाशित करतील. 

https://bhoomirashi.gov.in/search_proj_map.asp?st=27&t=1

#surat_chennai_Greenfield_expressway_mahiti