पोस्ट्स

आता शेतकऱ्यांना २४ तासात शेतमाल तारण कर्ज | Shetmal Taran Karj

इमेज
आता शेतकऱ्यांना २४ तासात शेतमाल तारण कर्ज Shetmal Taran Karj  राज्यातील शेतकऱ्यांना शेतमाल काढणीच्या काळात बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवली जाते.  शेतमाल तारण कर्ज या योजनेअंतर्गत शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या गोदामात साठवून त्यावर अल्प व्याजदराने कर्ज घेऊ शकतात. आता याच शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी गोदामात साठवणूक केलेल्या शेतमालावरती  ब्लॉकचेन  तंत्रज्ञानाचा वापर करून गोदाम पावती नुसार ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे जे शेतकऱ्यांना या पावतीच्या आधारे अवघ्या 24 तासांमध्ये उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्यामधील करारानुसार ब्लॉकचेन-तंत्रज्ञानावर आधारित शेतमाल तारण कर्ज योजना 9% व्याजदरांना राबवली जात आहे.  शेतमाल तारण कर्ज योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालावर तारण ठेवून मिळणारे कर्ज रक्कम अवघ्या 24 तासात शेतकऱ्यांच्या ...

Voter List Revision 2026 Maharashtra २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी येणार, आजच करा हे काम

इमेज
२७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी येणार, आजच करा हे काम  Voter List Revision 2026 Maharashtra 17 ऑगस्ट पर्यंत गनना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे निवडणूक आयोगाचे आवाहन. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे अंमलबजावणी सुरू असून या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील सर्व मतदारांनी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून आपला फोटो लावून आपल्या बी एल ओ कडं जमा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. https://youtu.be/UQ48spzZfpw?si=NR41UhXsYgqwPMBX या कार्यक्रमा अतर्गत आपले अर्ज भरून बीएलओकडे सादर करणाऱ्या नागरिकांची नावे 24ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.  24 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप मतदार यादीत नाव नसलेले मतदारांना तसेच राज्यातील नव मतदारांना 24 ऑगस्ट ते 23सप्टेंबर या कालावधीमध्ये नमुना सहा नमुना च्या माध्यमातून मतदार यादी मध आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. हा अर्ज केल्यानंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकारी त्या अर्जाची पडताळणी करतील कागदपत्राची तपासणी...

Teacher recruitment 2026 - राज्यात 32209 शिक्षक भरती प्रक्रिया सुरू

इमेज
पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू Teacher recruitment 2026 राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून 30209 पदांची पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या 13351, महानगरपालिकेच्या 1954, नगरपालिका नगरपरिषदांच्या 280, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 12148, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील 2421, तर शासकीय विद्यानिकेतनातील 56 अशा एकूण 30209 रिक्त पदांची ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामधील 19881 पदे ही मुलाखती शिवाय तर खाजगी संस्था मधील 10328 पदे ही मुलाखतीसह भरली जाणार आहेत. या रिक्त पदामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांसाठी 14320 पदांसाठी तर सहावी ते आठवी या वर्गांकरिता दहा हजार बारा पदांचा इयत्ता नववी ते दहावीच्या 5513 पदांचा तर इयत्ता अकरावी बारावीच्या 364 पदाचा समावेश आहे.  राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 27 मे ते पाच जून 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती या चाचणीसाठी दोन लाख 28 हजार 808 उमेदवारांना नोंदणी पूर्ण क...

पिक स्पर्धा खरीप हंगाम 2026, ऑनलाईन अर्ज सुरू | Pik Spardha Kharip 2026

इमेज
राज्यात खरीप हंगाम 2026 करता पीक स्पर्धा सुरू, ऑनलाइन अर्ज मागवले.  Pik Spardha Kharip 2026 राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात पीक उत्पादकता वाढावी यासाठी शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्या व उत्कृष्ट उत्पादन घेणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी पीक स्पर्धा आयोजित केली जाते.  खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामामध्ये राबवली जाणारी ही पिक स्पर्धा योजना खरीप हंगाम 2026 करता सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे. राज्यात स्वतः जमीन असणाऱ्या व स्वतःची कमीत कमी एक एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत खरीपासाठी 11 पिकासाठी स्पर्धेमध्ये भाग घेता येतो. खरीप हंगामात भात ज्वारी बाजरी, मका नाचणीतून मुरित सोयाबीन भुईमूग आणि सूर्यफूल अशा 11 पिकासाठी ही स्पर्धा राबवली जाते. पीक स्पर्धे अंतर्गत राज्यस्तरीय तीन पारितोषिक दिले जातात ज्याच्यामध्ये पहिलं पारितोषिक हे 50 हजार रुपये दुसरे 40 हजार तर तिसरं पारितोषिक 30000 रुपये असणार आहे. तर जिल्हास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन पारित...

शेळी,कुकुटपालनसाठी 50 लाख रु.अनुदान; लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन | national livestock mission

इमेज
पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित ‘राष्ट्रीय पशुधन अभियान’ योजना national livestock mission 2026   national livestock mission 2025  लाभ घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन   केंद्र शासनाने सन 2021-22 या  वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत रा ष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजूरी प्रदान केलेली आहे .  सदर योजने अंतर्गत शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती, तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनाकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान NLM)राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना (Livestock Insurance Scheme) राज्यात राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी   New Guidelines NLM Click Here NLM Website अनुदानाची अधिकतम मर्यादा  शेळी-मेंढी पालनाकरिता रु. 50 लक्ष,   कुक्कुट पालनाकरिता रु. 50 लक्ष,   वराह पालनाकरिता रु. 30 लक्ष  पशुखाद्य व वैरण विकास य...

कोणत्या महसूल मंडळात अतिवृष्टी; कुठे किती पाऊस | Maharain Maharashtra 2026

इमेज
कोणत्या महसूल मंडळात अतिवृष्टी; कुठे किती पाऊस Maharain Maharashtra 2026 महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध कृषी विभागामार्फत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात आल्या असून पर्जन्यमानाचा महसूल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक आकडेवारी अहवाल https://maharain.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे.  https://maharain.maharashtra.gov.in/test/maharain/ कृषी व पदुम विभागाच्या ८ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये ‘महावेध’ प्रकल्पाची सार्वजनिक खाजगी भागीदारीतुन ‘बांधा-मालक व्हा- चालवा’ (बीओओ) तत्वावर अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि यांची या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता सेवा पुरवठादार संस्था म्हणुन नियुक्ती केली आहे. प्रकल्पातंर्गत राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.  पर्जन्यमानाची आकडेवारीसाठी महारेन व महावेध या दोन स्वंतत्र प्रणाली कार्यान्वित ठेवण्याऐवजी महावेध प्रणालीमधील पर्जन्यविषयक आकडेवारी महारेन संकेत ...

६ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना ९१८ कोटींचा पीकविमा; वाटप सुरू | Kharip Pikvima 2025

इमेज
६ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना ₹९१८ कोटींचा पीकविमा मंजूर दुसऱ्या टप्प्याच वाटप सुरू Kharip Pikvima 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2025-26 अंतर्गत द्वितीय टप्यात ३८१.३३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरणास सुरुवात प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळापैकी 85 महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना एकूण 913 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. सोयाबीन पिकासाठी जिल्ह्यातील सर्व 93 महसूल मंडळे पात्र ठरली असून 6 लाख 34 हजार 623 शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ४,४४,८७९.३७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. दिनांक १६ मे २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार सोयाबीन पिकासाठी ८५ महसूल मंडळासाठी एकूण ९१३ कोटी रुपये नुकसानभरपाई निश्चित झाली असून त्यापैकी प्रथम टप्यात माहे एप्रिल २०२६ मध्ये ४१ महसूल मंडळातील सोयबीन पिक विमाधारक शेतकऱ्यांना ४९९.६० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्यात ८०:११० कप व कॅप मॉडेलनुसार राज्य शासन...