पिक स्पर्धा खरीप हंगाम 2026, ऑनलाईन अर्ज सुरू | Pik Spardha Kharip 2026
राज्यात खरीप हंगाम 2026 करता पीक स्पर्धा सुरू, ऑनलाइन अर्ज मागवले.
Pik Spardha Kharip 2026
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात पीक उत्पादकता वाढावी यासाठी शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्या व उत्कृष्ट उत्पादन घेणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी पीक स्पर्धा आयोजित केली जाते.
खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामामध्ये राबवली जाणारी ही पिक स्पर्धा योजना खरीप हंगाम 2026 करता सुरू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे.
राज्यात स्वतः जमीन असणाऱ्या व स्वतःची कमीत कमी एक एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत खरीपासाठी 11 पिकासाठी स्पर्धेमध्ये भाग घेता येतो. खरीप हंगामात भात ज्वारी बाजरी, मका नाचणीतून मुरित सोयाबीन भुईमूग आणि सूर्यफूल अशा 11 पिकासाठी ही स्पर्धा राबवली जाते.
पीक स्पर्धे अंतर्गत राज्यस्तरीय तीन पारितोषिक दिले जातात ज्याच्यामध्ये पहिलं पारितोषिक हे 50 हजार रुपये दुसरे 40 हजार तर तिसरं पारितोषिक 30000 रुपये असणार आहे. तर जिल्हास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन पारितोषिक दिली जातील ज्याच्यामध्ये पहिलं पारितोषिक 10000 दुसरे पारितोषिक 7000 तर तिसरे पारितोषिक 7000 रुपये असणार आहे याच प्रमाणे तालुका स्तरावरती देखील पहिले पारितोषिक 5000 दुसरे पारितोषिक 3000 व तिसरे पारितोषिक 2000 रुपये असणार आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण झालेला स्वतःची एक एकर जमीन असलेला व एक एकर जमिनीवरती सलग पीक असलेला एक वैयक्तिक शेतकरी आपल्या फार्मर आयडी सह या पीक स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो.
खरीप पिक स्पर्धा 2026 अंतर्गत अर्ज करताना सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना प्रति पीक तीनशे रुपये एवढं प्रवेश शुल्क द्यावा लागणार आहे तर अनुसूचित जमाती गटातील शेतकऱ्यांना हे शुल्क प्रती 150 रुपये असणार आहे.
पिक स्पर्धा खरीप हंगाम 2026 करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना शेतकऱ्यांना जमिनीचा ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी निर्धारित प्रवेश शुल्क भरल्याची चलन पावती जातीच्या अंतर्गत अर्ज असेल तर जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक असतात.