Recent Post

Popular Posts

आता शेतकऱ्यांना २४ तासात शेतमाल तारण कर्ज | Shetmal Taran Karj

आता शेतकऱ्यांना २४ तासात शेतमाल तारण कर्ज

Shetmal Taran Karj 

राज्यातील शेतकऱ्यांना शेतमाल काढणीच्या काळात बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवली जाते. 

शेतमाल तारण कर्ज या योजनेअंतर्गत शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या गोदामात साठवून त्यावर अल्प व्याजदराने कर्ज घेऊ शकतात.

आता याच शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी गोदामात साठवणूक केलेल्या शेतमालावरती ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून गोदाम पावती नुसार ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे जे शेतकऱ्यांना या पावतीच्या आधारे अवघ्या 24 तासांमध्ये उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.

महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्यामधील करारानुसार ब्लॉकचेन-तंत्रज्ञानावर आधारित शेतमाल तारण कर्ज योजना 9% व्याजदरांना राबवली जात आहे. 

शेतमाल तारण कर्ज योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालावर तारण ठेवून मिळणारे कर्ज रक्कम अवघ्या 24 तासात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी पाच लाख रुपयापर्यंत तर शेतकरी उत्पादक कंपन्या आणि समुदाय आधारित संस्थांसाठी 70 लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

शेतमाल तारण कर्ज योजना या योजनेअंतर्गत ब्लॉकचेन शेतमाल धारण कर्ज योजनेअंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील 8131 शेतकरी आणि 442 शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून 214 कोटी 58 लाख रुपयांचा कर्ज घेण्यात आलेला आहे. 

ब्लॉकचेन शेतमाल तारण कर्ज योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता बँकेच्या फेऱ्या न मारता डिजिटल पद्धतीने शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.