Voter List Revision 2026 Maharashtra ४ नोव्हेंबर अंतिम मतदार यादी येणार, आजच करा हे काम
४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी येणार, आजच करा हे काम
Voter List Revision 2026 Maharashtra
राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे अंमलबजावणी सुरू असून या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील सर्व मतदारांनी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून आपला फोटो लावून आपल्या बी एल ओ कडं जमा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
https://youtu.be/UQ48spzZfpw?si=NR41UhXsYgqwPMBX
31ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप मतदार यादीत नाव नसलेले मतदारांना तसेच राज्यातील नव मतदारांना 31 ऑगस्ट ते 30सप्टेंबर या कालावधीमध्ये नमुना सहा नमुना च्या माध्यमातून मतदार यादी मध आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. नावात काही त्रुटी असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत आवश्यक दावे आणि हरकती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हा अर्ज केल्यानंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकारी त्या अर्जाची पडताळणी करतील कागदपत्राची तपासणी करतील आणि पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादी मध्ये समाविष्ट केली जाणार आहेत.
या एक महिन्याच्या कालावधी दरम्यान मतदारांना आपले नावे समाविष्ट करणे याचबरोबर नमुना आठच्या माध्यमातून आपल्या नोंदीमध्ये असलेली काही दुरुस्ती करणे किंवा नमुना आठच्या माध्यमातून नोंदी वगळण्याच्या संदर्भातील काही हरकती असतील तर त्या नोंदवता येणार आहेत.
याचबरोबर या कार्यक्रमाच्या अंतर्गत मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करणे दुरुस्ती करणे किंवा नाव वर्ण इत्यादी बाबींची पूर्तता केली जात असताना यामध्ये दिलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास त्या मतदारावरती कारवाही देखील केली जाणार आहे.
याच्या अंतर्गत राज्यातील लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्तीवर एक वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद केली जाऊ शकते.
या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर या कार्यक्रमांतर्गत राज्यातील अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.