Teacher recruitment 2026 - राज्यात 32209 शिक्षक भरती प्रक्रिया सुरू

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

Teacher recruitment 2026

राज्यात शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून 30209 पदांची पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या 13351, महानगरपालिकेच्या 1954, नगरपालिका नगरपरिषदांच्या 280, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 12148, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील 2421, तर शासकीय विद्यानिकेतनातील 56 अशा एकूण 30209 रिक्त पदांची ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.


यामधील 19881 पदे ही मुलाखती शिवाय तर खाजगी संस्था मधील 10328 पदे ही मुलाखतीसह भरली जाणार आहेत.

या रिक्त पदामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांसाठी 14320 पदांसाठी तर सहावी ते आठवी या वर्गांकरिता दहा हजार बारा पदांचा इयत्ता नववी ते दहावीच्या 5513 पदांचा तर इयत्ता अकरावी बारावीच्या 364 पदाचा समावेश आहे. 

राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 27 मे ते पाच जून 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती या चाचणीसाठी दोन लाख 28 हजार 808 उमेदवारांना नोंदणी पूर्ण केलेली होती ज्यापैकी दोन लाख 11 हजार तीनशे आठ उमेदवार चाचणी प्विष्ट झाले असून त्यापैकी एक लाख 70 हजार 108 उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

या उमेदवारांना पदभरतीसाठी या संकेतस्थळावरती प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना आता शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले असून सहा ऑगस्ट 2025 पासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या उमेदवारांना पदनिहाय पसंती क्रमांक नोंदवून 11 ऑगस्ट 2026 पर्यंत तो लॉक करणे आवश्यक आहे.

#MaharashtraTeacherRecruitment #TAIT2025 #PavitraPortal #ShikshakBharti #MaharashtraEducation #ShikshanSevak #TeacherRecruitment2025 #MaharashtraGovtJobs #EduPavitra

राज्यात  ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती

Mega Bharati 2026

Mega Bharati 2026

राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार  निर्णय घेण्याचे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.



राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात. मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे.

Mega Bharati 2026

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी  इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या.

पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी.

त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026