शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! परदेश अभ्यास दौरा योजना 2026 जाहीर | Shetkari Pardesh Abhyas Daura Scheme
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! परदेश अभ्यास दौरा योजना 2026 जाहीर
Shetkari Pardesh Abhyas Daura Scheme
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीविषयक ज्ञान वाढवण्यासाठी आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे.
सन 2026 27 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
GR PDF येथे पहा 👇🏻
योजनेचा मुख्य उद्देश
- प्रगत देशामध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देणे.
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मधील शेतमालांची मागणी कृषीमालांची प्रक्रिया व शेतमालाच्या निर्यातीबाबत ज्ञान मिळवून देणे.
- दौऱ्या दरम्यान परदेशातील शेतकऱ्यांशी थेट चर्चा करणं तिथल्या शेतजमिनी आणि संबंधित संस्थांना भेटी देऊन क्षमता वाढवणे.
निवड प्रक्रिया
राज्यातील 34 जिल्ह्यामधील एकूण 180 शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून प्रत्येक 20 शेतकऱ्यामागे एक अधिकारी अशाप्रकारे 9 मार्गदर्शक अधिकारी या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत.
202627 मध्ये राबवल्या जाणाऱ्या देशाबाहेरील अभ्यास दौरे या योजने करता राज्य शासनाच्या माध्यमातून चार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
अर्ज कसा करावा
- योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि अर्जाची प्रक्रिया लवकरच कृषी आयुक्तांकडून (महाराष्ट्र राज्य) जारी केली जाईल
. अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी महाराष्ट्र शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्याwww.maharashtra.gov.in