७५% अनुदानावर कृषी अवजारे, ताडपत्री जिल्हा परिषद नवीन अर्ज सुरू | zp scheme 2026

७५% अनुदानावर कृषी अवजारे, ताडपत्री जिल्हा परिषद नवीन अर्ज सुरू 

Zp scheme 2026


 Zilla Parishad Agriculture Subsidy Scheme (2026-27)

शेतकऱ्यांना अनुदानावर कृषीविषयक सहाय्यभूत ठरणाऱ्या अनेक वस्तूंचे वाटप जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेअंतर्गत होत आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे. 

जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत अनुदानावर कृषी साहित्याचा लाभ घेण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत असून केवळ गटविकास अधिकारी यांच्या मार्फत अर्ज जिल्हा परिषद कृषी विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत सध्या सातारा जिल्हा परिषद व बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 

सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून 11 बाबींकरिता 15 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर पशुसंवर्धन विभागाच्या दोन योजनांकरता 20 सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावरती कृषी अवजारे दिले जाणार आहेत याच्यासाठी 20 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 

सातारा जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग योजना

  1. सर्वसाधारण लाभार्थी ५+१ गट वाटप - या बाबी अंतर्गत लाभार्थ्यांना पाच शेळी एक बोकड गटाचे 50% अनुदान किंवा 43142 रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाईल या योजनेअंतर्गत पाच टक्के अपंग आणि 30% महिलांसाठी आरक्षण देण्यात येईल. 
  2. कामधेनू आधार योजना १ गाय म्हैस गट वाटप - या बाबी अंतर्गत विधवा परितक्त्या किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी एक गाय किंवा एक मेसेज वाटप केले जाईल यासाठी 50% किंवा 56018 रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाईल.

सातारा जिल्हा परिषद कृषी विभाग योजना

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत 11 योजनांसाठी अर्ज मागविण्यात आलेले येतात हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने 15 सप्टेंबर 2026 पर्यंत स्वीकारले जातील.

  1. कडबाकुट्टी यंत्र - ५०% किंवा कमाल रु. १३,०००/-
  2. ताडपत्री - ५०% (कॅनव्हास: कमाल रु. २५००/- | HDPE: कमाल रु. २०००/-)
  3. बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप - ५०% किंवा कमाल रु. २०००/-
  4. ५ किंवा ७.५ HP विद्युतपंप - ५०% किंवा कमाल रु. १५,०००/-
  5. ३ HP विद्युतपंप - ५०% किंवा कमाल रु. १२,०००/-
  6. HDPE व PVC पाईप्स (कमाल ३० पाईप) - ५०% (६३mm HDPE / ७५mm PVC: रु. ३५०/पाईप | ७५mm HDPE: रु. ४५०/पाईप | ९०mm PVC व HDPE: रु. ५५०/पाईप)
  7.  कृषी यांत्रिकीकरण (पल्टी नांगर, पाचट कुट्टी, पेरणी यंत्र इ.) - ५०% (कमाल मर्यादा: पेरणी यंत्र रु. २०,०००/-; पल्टी नांगर रु. ४०,०००/-; खोडवा कटर रु. ४५,०००/-; पाचट कुट्टी रु. ८०,०००/-; बियाणे टोकण रु. ९,०००/-)
  8. पॉवर वीडर - ४०% किंवा कमाल रु. ५५,०००/-
  9. सेंद्रिय शेती प्रोत्साहन (ताग व धैंचा बियाणे) - ५०% किंवा कमाल रु. १५००/-
  10. कोळपी - ७५% किंवा कमाल रु. १२२०/-
  11. प्रकाश सापळा (कीड नियंत्रणासाठी) - ५०% किंवा कमाल रु. १०५०/-

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

जिल्हा परिषद बुलढाणा कृषी विभागाच्या सेस फंड योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रसामग्रीसाठी ७५ टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेतून ५ एच.पी. मोटारपंप संच, ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर, बी.बी.एफ. प्लांटर, पेरणी यंत्र या बाबी अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

योजनेअंतर्गत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे दि. २० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत खालील कागदपत्रे पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करणे अनिवार्य आहे:

  • ७/१२ आणि ८-अ उतारा
  • आधार कार्ड (झेरॉक्स)
  • बँक पासबुक (झेरॉक्स)
  • यंत्रसामग्रीचे आवश्यक तांत्रिक कागदपत्रे (Quotation इ.)

अर्जदाराने यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. अर्जदार दिव्यांग असल्यास तसे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. केवायसी झालेल्या बँकेच्या पासबुकाचे पहिल्या पान, आधारकार्ड यांच्या झेरॉक्स, तसेच कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) यांचे शिफारसपत्र अर्जाला जोडावे, असे आवाहन जिल्हा कृषीविकास अधिका-यांनी केले आहे.

#KrushiYojana #SataraZP #AgricultureScheme #ShetkariMitra #MaharashtraFarmers #Subsidy #शेती_योजना #सातारा #शेतकरी #कृषी_विभाग #FarmMechanization 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi