कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान २०२६: ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि ड्रोन अनुदानात मोठे बदल! | krushi yantrikikaran yojana maharashtra 2026

कृषी यांत्रिकीकरण योजना 2026

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान २०२६: ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि ड्रोन अनुदानात मोठे बदल!

krushi yantrikikaran yojana maharashtra 2026

हल्ली मशागतीची कामं करण्यासाठी हवं तेवढं मनुष्यबळ मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणं गरजेचे बनत चाललं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देत.


krushi yantrikikaran yojana maharashtra 2026
krushi yantrikikaran yojana maharashtra 2025

 कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (SMAM) सुधारित मार्गदर्शक तत्त्वे २०२६

कृषी पदवीधरांना ड्रोन सीएचसी (CHC) स्थापन करण्यासाठी मूळ किमतीच्या ५०% किंवा कमाल ₹५.०० लाख (जो कमी असेल तो) अनुदानाचा लाभ मिळेल. ड्रोनद्वारे फवारणी सेवा घेणाऱ्या अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ₹२,००० प्रति हेक्टर (कमाल २ हेक्टर/वर्ष) आर्थिक मदत मिळेल.

₹१.०० लाख किंवा त्याहून अधिक किमतीच्या सर्व स्वयंचलित (Self-propelled) यंत्रांवर अ‍ॅप-आधारित AI टेलीमॅटिक्स किट बसवणे बंधनकारक आहे, ज्याद्वारे थेट स्थान व कामाची नोंद राहील. तसेच ₹१.०० लाख व त्यावरील सर्व यंत्रांचे जिओ-टॅगिंग (Georeferencing) अनिवार्य आहे.

अल्प, अत्यल्प भूधारक, महिला, SC/ST शेतकऱ्यांसाठी ५०% आणि इतर शेतकऱ्यांसाठी ४०% अनुदान उपलब्ध आहे. ४० एचपीपेक्षा जास्त क्षमतेचे ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर यांसारख्या महागड्या यंत्रांसाठी वैयक्तिक अनुदानाऐवजी कस्टम हायरिंग सेंटरला प्राधान्य दिले जाईल आणि यासाठी एकूण बजेटच्या २५% पेक्षा जास्त निधी वापरता येणार नाही.

SMAM New Guidelines 2026 

PDF Link

GR 14.08.2026

सन 2026-27 या आर्थिक वर्षात कृषि समृध्दी योजनेंतर्गत मंजूर तरतूदीमधून सूक्ष्म सिंचन योजना, कृषि यांत्रिकीकरण योजना व मुख्यमंत्री कृषि अन्न प्रक्रिया योजना याअंतर्गत असलेले प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रु.600.00 कोटी इतका निधी वितरीत

PM RKVY अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उप अभियानासाठी सन 2026-27 मध्ये तिन्ही प्रवर्गासाठी (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती.) दुसऱ्या हप्त्याचा एकूण रु.218.05 कोटी इतका निधी वितरीत

GR 27.02.2026

सन २०२२-२३ ते २०२५-२६ या वर्षात प्रधान मंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (PM-RKVY)-DPR Based component अंतर्गत रु.३५०.०० कोटी निधीचा कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प राबविण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता

GR 23.01.2026

सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी रु.50.00 कोटी इतका निधी वितरीत

या योजने मध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते. 

उदा. ट्रॅक्टर, पॉवर टीलर, 

स्वयंचलित औजारे उदा.रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)

ट्रॅक्टर चलीत औजारे उदा. रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर, 

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे उदा.मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर,

अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकरी यांना अनुदान दिले जाते.



 GR  krushi yantrikikaran yojana maharashtra 2026

कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मार्गदर्शक सुचना 2026

krushi yantrikikaran yojana maharashtra 2026 आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात

  1. 7/12 व 8 अ, ( satbara , 8a )
  2. बँक पास बुक, ( Bank Pas book )
  3. आधार कार्ड,  (Adhar card )
  4. यंत्राचे कोटेशन, ( quotation )
  5. परिक्षण अहवाल, ( test Report )
  6. जातीचा दाखला. ( cast certificate if SC ST ) 

विविध औजारांसाठी अनुदानाची  रक्कम 

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)-

अ.ट्रॅक्टर 

  • ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/-

ब. पॉवर टिलर - 

  • 8 बीएच पी पेक्षा कमी - 65000/-
  • 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त - 85000/-

क. स्वयंचलित अवजारे

  • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 175000/-
  • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 250000/-
  • रीपर - 75000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) - 25000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) - 35000/-
  • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) - 63000/-

ड.  ट्रॅक्टर 

  1. ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे
  2. रोटाव्हेटर 5 फुट - 42000/-
  3. रोटाव्हेटर 6 फुट - 44800/-
  4. थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) - 100000/-
  5. थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) - 250000/-
  6. पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) - 20000/-
  7. रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
  8. कल्टीव्हेटर - 50000/-
  9. पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम - 70000/-
  10. पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम - 89500/-
  11. पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम - 40000/-
  12. नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम - 50000/-
  13. ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
  14. विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/-
  15. कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/-

Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)-  50 टक्के, 20000/- रु.

Manually operated chaff cutter (above 3 feet)-  50 टक्के, रु.6300/-.

Manually operated chaff cutter ( upto 3 feet)-  50 टक्के, रु.5000/-.

अनुदान - इतर लाभार्थी यांना 40 टक्के

अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी )-100000/-

ब. पॉवर टिलर - 

8 बीएच पी पेक्षा कमी - 50000/-

8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त - 70000/-

क. स्वयंचलित अवजारे

  • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 140000/-
  • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 200000/-
  • रीपर - 60000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड  ) - 20000/-
  • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) - 30000/-
  • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) - 50000/-

ड. ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलितअवजारे

  • रोटाव्हेटर 5 फुट - 34000/-
  • रोटाव्हेटर 6 फुट - 35800/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)- 80000/-
  • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)- 200000/-
  • पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) - 16000/-
  • रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-
  • कल्टीव्हेटर - 40000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम - 56000/-
  • पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम - 71600/-
  • पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम - 32000/-
  • पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम - 40000/-
  • ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर- 100000/-
  • विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 60000/-
  • कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -80000/-
  • Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)-  40 टक्के, 16000/- रु.
  • Manually operated chaff cutter (above 3 feet)-  40 टक्के, रु.5000/-.
  • Manually operated chaff cutter ( upto 3 feet)-  40 टक्के, रु.4000/-.

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान-

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा-

  • मिनी दाल मिल- 60 टक्के,150000/-
  • मिनी राईस मिल- 60 टक्के,240000/- 
  • पैकिंग मशीन- 60 टक्के 300000/-
  • सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर- 60 टक्के, 60000/-
  • सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर- 50 टक्के,100000/-




इतर लाभार्थी  -

  1. मिनी दाल मिल-50 टक्के, 125000/- 
  2. मिनी राईस मिल- 50 टक्के,200000/-
  3. पैकिंग मशीन- 50 टक्के,240000/-
  4. सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर-50 टक्के,50000/-
  5. सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर- 40 टक्के,80000/-

अर्जाची लिंक

पात्र औजारे व मिळणार अनुदान

#SMAMScheme2026 #कृषीयांत्रिकीकरण2026 #शेतीअवजारेअनुदान #TractorSubsidy #KisanDrone #MahaDBT #MahaDBTFarmer #AgricultureMechanization


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi