MahaID Registration आता महाडिबीटी वर 29 नव्या योजना, लवकरच सर्व योजना पोर्टलवर
आता महाडिबीटीवर नव्या 29 योजनांचा समावेश, लवकरच सर्व योजना येणार पोर्टलवर.
आता 105 योजना MahaDBT 2.0 पोर्टलवर उपलब्ध
MahaID registration
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'महा आयडी' (Maha ID) आवश्यक असणार आहे. राज्यात सर्व योजनांचे लाभ एकाच आयडीच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.
विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी अशा वर्गातील नागरिकांना एकाच पोर्टलवर अनेक योजना उपलब्ध करून दिल्या जात असून MahaID च्या माध्यमातून या योजनांचे अर्ज करता येणार आहेत.
अशी बनवा आपली MahaID
राज्य शासनाने विविध विभागाच्या अनेक योजना सठी एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा एकात्मिक प्रणाली MahaDBT 2.0 या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांना सिंगल साइन इन, रियल टाईम मॉनिटरिंग साठी लाईव्ह डॅशबोर्ड, तुमच्यासाठी पात्र असलेल्या योजना यासारख्या सुविधा या पोर्टलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
राज्य शासनाच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टल वरती आत्तापर्यंत सर्व विभागाच्या 76 योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या यामध्ये 15 ऑगस्ट 2026 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 29 योजनांचा समावेश करून आता महाडीबीटी 2.0 च्या पोर्टल वरती एकूण 105 योजनांची संख्या झालेली आहे.
लवकरच याच्यामध्ये इतर विभागाच्या ही योजना समाविष्ट करून एकूण महाडीबीटी 2.0 च्या पोर्टलच्या माध्यमातून 231 योजना या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सर्व योजना एकाच पोर्टल वरती उपलब्ध झाल्यामुळे याचबरोबर प्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे लाभ डीबीटीच्या माध्यमातून दिले जाणार असल्यामुळे याच्यामध्ये नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.