Lek Ladki Yojana Maharashtra शासनाचा मोठा निर्णय! ऑनलाईन अर्ज | अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहीर!
लेक लाडकी योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया होणार सोपी, राज्य शासनाचा मोठा निर्णय.
आता थेट DBT ने लाभ, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
Lek Ladki Yojana Maharashtra
राज्यात एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लेक लाडकी योजना राबवली जात आहे.
मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये तर अकरावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये असा एकूण एक लाख एक हजार रुपयाचा लाभ या मुलीला दिला जातो.
एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींचा अद्याप अर्ज केलेला नसेल तर अशा मुलींचे अर्ज लाभासाठी करता येणार आहेत. एक एप्रिल 2023 पासून पात्र लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट 2017 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने Aple Sarkar पोर्टल वरती अर्ज करता येणार आहेत.
नवीन जन्म झालेल्या मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक असणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेमध्ये अर्ज करत असताना आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती Auto Fetch होणार असून लाभार्थी माता पिता यांची ई केवायसी करण्यात येणार असून यामुळे आता वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज पडणार नाही.
याचबरोबर ऑनलाईन पद्धत असल्यामुळे पुढील टप्प्यासाठी लाभासाठी लाभार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची देखील आवश्यकता असणार नाही पात्र लाभार्थ्याच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे.