पोस्ट्स

Lek Ladki Yojana लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Lek Ladki Yojana Maharashtra शासनाचा मोठा निर्णय! ऑनलाईन अर्ज | अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहीर!

इमेज
लेक लाडकी योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया होणार सोपी, राज्य शासनाचा मोठा निर्णय. आता थेट DBT ने लाभ, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन Lek Ladki Yojana Maharashtra  राज्यात एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लेक लाडकी योजना राबवली जात आहे.  लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक लाख एक हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. यामध्ये मुलीच्या जन्मानंतर खात्यामध्ये पहिला हप्ता 5000 रुपये तर दुसरा हप्ता इयत्ता पहिली प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपये इतका जमा केला जातो.  मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये तर अकरावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये असा एकूण एक लाख एक हजार रुपयाचा लाभ या मुलीला दिला जातो.  याच योजनेमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता राज्यात लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आपले सरकार पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.  एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर...

राज्यात ‘लेक लाडकी योजना’ | Lek Ladki Yojana

इमेज
लेक लाडकी सुधारित योजना   Lek Ladki Yojana महाराष्ट्रात  मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे अशी अनेक उद्दिष्ट घेऊन   ‘लेक लाडकी योजना’ | Lek Ladki Yojana   ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली  आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना संदर्भाधीन दिनांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करुन मुलींच्या सक्षमीकरणा करिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषंगाने सन २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष...