सावधान! पीक विम्याचे नियम बदलले; 'ही' १ चूक भोवणार; नवी बदल तुम्हाला ठाऊक आहेत का? | PikVima Yojana 2026
सावधान! पीक विम्याचे नियम बदलले; 'ही' १ चूक भोवणार
खरीप पीकविमा योजनेत नवे बदल, पीकविमा भरताना या चुका टाळा; अन्यथा योजनाचा लाभ बंद
५ वर्षासाठी ब्लॉक, नमो शेतकरी हप्ताही केला जाणार बंद
PikVima Yojana 2026
राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी काही कडक नियम लागू केले आहेत. यात ई-पीक पाहणी सक्तीची करण्यापासून ते चुकीची माहिती दिल्यास होणाऱ्या कारवाईपर्यंतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सहभाग नोंदवण्यासाठी आता शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक अर्थात ॲग्री स्टॅक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असताना शेतकऱ्यांनी डिजिटल प्रिक सर्वेक्षण अर्थात DCS MH या ई पीक पाहणी ऍप्लिकेशन च्या माध्यमातून पिकांची नोंद केलेली असणं बंधनकारक असणार आहे.
याचप्रमाणे या योजनेच्या अंतर्गत मयत शेतकऱ्याच्या नावे विमा भरल्यास ती विमा पॉलिसी बाद करून त्या पॉलिसीच्या विमा हप्त्याची रक्कम जप्त केली जाणार आहे.
2026 च्या खरीप हंगामामध्ये पिक विमा भरत असताना शेतकऱ्याच्या माध्यमातून बोगस किंवा चुकीच्या पद्धतीने विमा घेतल्यास त्या शेतकऱ्याला पिकविमा, कृषी विभागाच्या योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसारख्या डीबीटी योजना मधून पाच वर्षासाठी ब्लॉक केलं जाणार आहे.
किमान क्षेत्र अट
पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याकडून कमी क्षेत्राच्या पिक विमा पॉलिसी भरल्या जातात याच्यावरतीही आता बंधना घालण्यात आलेले असून खरीप हंगाम 2026 पासून पीक विमा योजनेमध्ये कमीत कमी दहा गुंठे क्षेत्राचा पिक विमा भरता येणार आहे.
#PikVimaYojana2026 #Pikvima