ग्रामपंचायतींना ५ नवीन कामांसाठी निधी; विशेष अनुदान १५ ते २० लाख | Grampanchayat jansuvidha vishesh anudan yojana

ग्रामपंचायतींना ५ नवीन कामांसाठी निधी; विशेष अनुदान १५ ते २० लाख

गावात होणार वाचनालय, सोलर अन् क्रीडांगण! ग्रामपंचायतीसाठी जनसुविधा योजनेचा नवा GR

 Grampanchayat jansuvidha vishesh anudan yojana

Grampanchayat jansuvidha vishesh anudan yojana

राज्यातील ग्रामपंचायत मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत नवीन पाच बाबींचा समावेश करून या बाबींकरता निधी खर्च करण्याच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 20 जुलै 2026 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करून या योजनेमधील नवीन बदलाला मंजुरी देण्यात आलेली आहे. नवीन शासन निर्णयानुसार आता ग्रामपंचायतीला गावामध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करणं या कामासाठी कमाल 15 लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे तर शासकीय कार्यालयावरील सोलर बसवणे या बाबीसाठी 20 लाख रुपयांची खर्च मर्यादा देण्यात आलेली आहे. 

याचप्रमाणे वाचनालय इमारत बांधकाम करणे या बाबीसाठी देखील वीस लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. 


तसेच गावातील मैदानाचा विकास करणे या बाबीसाठी 20 लाख तर गावाच्या हद्दीत असलेल्या शासकीय जागेचा सौंदर्यकरण करणे या बाबीसाठी 15 लाख रुपयापर्यंत निधी तथा ग्रामपंचायतीला खर्च करता येणार आहे. 

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीच्या जन सुविधा योजनेची व्याप्ती वाढवल्यामुळे आता जिल्हा वार्षिक योजनेमधून ग्रामपंचायतीला या पाच कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

या योजनेअंतर्गत कामाला मंजुरी दिली जात असताना निधी दिला जात असताना कुठल्याही एकाच कामासाठी दुसऱ्या कुठल्याही शासकीय योजनेमधून निधी दिला जाऊ नये एकाच कामासाठी दोन वेगवेगळे योजनेतून निधी घेतला जाऊ नये दुरुपते टाळावे अशा प्रकारचे निर्देश सुद्धा ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. 

शासन निर्णय येथे पहा 👇🏻 👇🏻 

#JanSuvidhaYojana #GrampanchayatGR #MaharashtraGR #GrampanchayatNidhi

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map