अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती; या जिल्ह्यात अर्ज सुरू | Anganvadi sevika Bharati 2026
अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती; या जिल्ह्यात अर्ज सुरू
रिक्त असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरू
Anganvadi sevika Bharati 2026
एकात्मिक बाल व विकास सेवा योजना कोरेगाव अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक महिलांनी 6 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत.
किन्हई या ठिकाणी अंगणवाडी सेविका या पदाची भरती करण्यात येणार आहे. तर अंगणवाडी मदतनीस भोसे, शेंदूरजणे, घाडगेवाडी, हिवरे, भाडळे बेघरवस्ती, होलेवाडी, अंबवडे सं. वाघोली, पिंपोडे खुर्द, बनवडी, पिंपोडे बु, (केंजळेवस्ती), कोलवडी, सोळशी, नांदवळ, करंजखोप, आझादपूर या ठिकाणी पदभरती होणार आहे. अर्जासाठी व अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प-2 भैरवनाथ कॉम्प्लेक्स, आझाद चौक कोरेगाव येथे संपर्क साधावा.
सोलापूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 61 अंगणवाडी सेविका आणि 115 मदतनीस पदांच्या एकूण 176 रिक्त जागांसाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या अंगणवाडी भरती अंतर्गत महिला उमेदवारांना 20 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत अर्ज सादर करता येतील.
सदरची पदभरती ही अक्कलकोट, बार्शी, वैराग, करमाळा, माढा, टेंभुर्णी, माळशिरस, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला आणि उत्तर व दक्षिण सोलापूर या तालुक्यात होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी संबंधित बालविकास प्रकल्प कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड पुरंदर वेले मुळशी बारामती मावळ हवेली उरुळी कांचन व भोर या तालुक्यातील रिक्त असलेल्या क्षेत्रांमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत रिक्त अंगणवाडी पदाकरता सरळ नियुक्तीने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मांडण पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
शैक्षणिक व ईतर पात्रता
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदाच्या पदभरती करिता किमान बारावी उत्तीर्ण अथवा समकक्ष शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
या पदभरतीसाठी उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा स्थानिक रहिवासी म्हणजे ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी वस्ती पाडे यातील उमेदवारांना स्थानिक समजण्यात येईल व अशी महिला उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र राहील यासाठी तहसीलदार यांच्याकडून देण्यात आलेला रहिवासी दाखला जोडावा लागणार आहे.
उमेदवाराला मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवारांना इत्यादी अथवा शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2023 मधील परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक आढळते पैकी किमान एक अर्थ मराठी भाषा विषयावरती उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवाराला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक दाखले ऑनलाइन जोडणे अनिवार्य असणार आहे लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात आपत्य असावे दोन हयात आपत्या पेक्षा अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
रिक्त असलेल्या जागाची जाहिरात
- पुरंदर - 5 अंगणवाडी सेविका व 12 अंगणवाडी मदतनीस अर्ज करण्याची मुदत 24.06.2026 To 08.07.2026
- Anganvadi Sevika / Anganvadi Madatnis Advertisement Purandar PDF
- वेल्हे - 8 अंगणवाडी सेविका व 23 अंगणवाडी मदतनीस अर्ज करण्याची मुदत 24.06.2026 To 08.07.2026
- Anganvadi Sevika / Anganvadi Madatnis Advertisement Velhe PDF
- मुळशी - 2 अंगणवाडी सेविका व 21 अंगणवाडी मदतनीस अर्ज करण्याची मुदत 24.06.2026 To 10.07.2026
- Anganvadi Sevika / Anganvadi Madatnis Advertisement Mulshi PDF
- बारामती - 1 अंगणवाडी सेविका व 3 अंगणवाडी मदतनीस अर्ज करण्याची मुदत 24.06.2026 To 09.07.2026
- Anganvadi Sevika / Anganvadi Madatnis Advertisement Baramati PDF
- मावळ - 5 अंगणवाडी सेविका व 26 अंगणवाडी मदतनीस अर्ज करण्याची मुदत 06.07.2026 To 24.07.2026
- Anganvadi Sevika / Anganvadi Madatnis Advertisement Maval PDF
- हवेली - 1 अंगणवाडी सेविका व 08 अंगणवाडी मदतनीस अर्ज करण्याची मुदत 06.07.2026 To 17.07.2026
- Anganvadi Sevika / Anganvadi Madatnis Advertisement Haveli PDF
- उरुळिकांचन - 0 अंगणवाडी सेविका व 06 अंगणवाडी मदतनीस अर्ज करण्याची मुदत 06.07.2026 To 17.07.2026
- Anganvadi Sevika / Anganvadi Madatnis Advertisement Uruli Kanchan PDF
- भोर - 0 अंगणवाडी सेविका व 06 अंगणवाडी मदतनीस अर्ज करण्याची मुदत 06.07.2026 To 17.07.2026
- Anganvadi Sevika / Anganvadi Madatnis Advertisement BHOR PDF