Monsoon Session 2026- पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाचा मोठा निर्णय; मंत्रालय प्रवेशासाठी नवा नियम

पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाचा मोठा निर्णय; मंत्रालय प्रवेशासाठी नवा नियम

मंत्रालय प्रवेशासाठी छापील पास बंद, चेहरा पडताळणी द्वारेच प्रवेश.

Monsoon Session 2026 Maharashtra 

राज्याचे पावसाळी अधिवेशन 22 जून 2026 पासून विधान भवन मुंबई येथे सुरू होणार आहे. या अधिवेशनादरम्यान विधान भवन परिसरामध्ये होणारे गर्दी नियंत्रित असावी याचबरोबर सुरक्षाची कारणे यास्तव राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

22 जून ते 10 जुलै 2026 या दरम्यान पार पडणाऱ्या या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रथमच एकही प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून प्रत्येक प्रवेश हा चेहरा पडताळणी पद्धतीद्वारे दिला जाणार आहे. 

अधिवेशनादरम्यान पिठाशीन अधिकारी मुख्यमंत्री अधिकारी कर्मचारी वर्ग स्वी सहाय्यक अभ्यंगत या सर्वांसाठी विधान भवन ई प्रवेश प्रणाली द्वारे चेहरा पडताळणी पद्धती अवलंबित येणार असल्यामुळे एकही छापील प्रवेश पास स्वीकारला जाणार नाही.

पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधान भवन परिसरामध्ये होणारे गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच सुरक्षा यंत्रणेला तपासणी संदर्भात सुलभता आणण्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये छापील प्रवेश पत्र ऐवजी आता चेहरा पडताळणी पद्धती अवलंबिण्यात येणार आहे. 

यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच अन्य सर्व संबंधित आस्थापना, वार्तांकनासाठी येणारी न्यूज चॅनलचे रिपोर्टर याचप्रमाणे आयएएस, आयपीएस आणि इतर सर्व अधिकारी कर्मचारी, सचिव विशेष कार्य अधिकारी, सर्व स्वीय सहाय्यक या सर्वांना या संदर्भात विधानमंडळ सचिवालयातर्फे सुचित करण्यात आलेले आहे.

या प्रवेशासाठी ई-ऑपिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने माहिती पाठवणे आवश्यक ती माहिती मेल वरती प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून वीस व 21 जून रोजी सुट्टीच्या दिवशी ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.  पावसाळी अधिवेशन 2026 च्या मंत्रालय प्रवेशासाठी अवलंबिल्या जाणाऱ्या नव्या प्रवेश पास प्रणालीचा सर्वांनी स्वीकार करावा आणि सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन विधानमंडळ सचिवालयातर्फे करण्यात आले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map