Monsoon session 2026 राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ; पावसाळी अधिवेशनात १० विधेयक मांडणार. Monsoon Session 2026 राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांची 36,585 कोटींची कर्जमाफी, महिला शेतकरी विधेयकासह पावसाळी अधिवेशनात सरकार 10 विधेयके मांडणार. राज्यात 22 जून 2026 ते 10 जुलै 2026 या कालावधीमध्ये राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजित करून या अधिवेशना संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे. आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 22 जून पासून सुरु होणाऱ्या राज्याच्या या विधिमंडळाच्या प...