मोठी बातमी! राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून | Monsoon Session 2026

मोठी बातमी! राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून

पावसाळी अधिवेशनाचा कालावधी जाहीर झाला असुन २२ जून ते १० जुलै असं ३ आठवडे अधिवेशन चालणार आहे.

Monsson session 2026

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. राज्य विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनाचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. 

राज्याचे 2026 चे पावसाळी अधिवेशन हे 22 जून पासून 10 जुलै या कालावधीमध्ये पार पडणार आहे, तब्बल तीन आठवडे हे अधिवेशन चालणार असून राज्यातील विविध महत्त्वाचे प्रश्न धोरणात्मक निर्णय आणि जनहिताचे मुद्दे या अधिवेशनात चर्चेला घेतले जातील. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असलेला ज्वलंत प्रश्न, शेतकऱ्यांचा पिक विमा महिला सुरक्षा, राज्यातील कायदा व सुव्यवस्था बेरोजगारी पावसाळ्यापूर्वीच्या पुरी तयारी पायाभूत सुविधा अशा अनेक मुद्द्यावरती विरोधी पक्षाकडून सरकारला घेरले जाण्याचे शक्यता आहे. 

तर राज्य सरकारकडून राज्यातील विविध विकासकाम कल्याणकारी योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी आगामी धोरणात्मक निर्णयाची माहिती अशा प्रकारची माहिती सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे राज्यातील विविध विधेयक प्रश्नोत्तराचा तास लक्षवेधी सूचना मधून अनेक महत्त्वाचे विषय या अधिवेशनामध्ये चर्चेला जाणार आहेत. 

याच अधिवेशनात सरकारच्या माध्यमातून महिला शेतकरी विधेयक आणले जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आगामी विधान परिषद च्या निवडणुका, राज्यातील राजकीय घडामोडी या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे यामुळे 22 जून पासून सुरु होणाऱ्या या पावसाळ्यात व्यसनाकडे राज्यातील सर्वसामान्यांचे लक्ष लागलेलं आहे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map