Recent Post

Popular Posts

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू. | Mahadbt farmer Scheme 2026

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू

Battery Operated Sprayer Subsidy 2026

सन 2026-27 मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी  महाडीबीटी पोर्टलवर अर्ज.

कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने  राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी  mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी योजनांचे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू. 

Mahadbt farmer Scheme 2026

कृषि यांत्रीकीरण उपअभियान/ राज्य पुरस्कृत कृषि यांत्रीकीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना. 

कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” ( Mahadbt farmer Scheme 2026 ) या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाव्दारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीव्दारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य, भरडधान्य, पौष्टीक तृणधान्य व कापुस विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2026 या वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्रय देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे.

राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानात यांत्रिकीकरण योजनांसाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

पाईप (HDPE PIPES/PVC PIPES)

वैयक्तिक शेतकरी वापरासाठी पाण्याच्या स्त्रोता पासून शेतापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाईप खरेदीवर एचडीपीई पाईप्स ५० मीटर व पीव्हीसी पाईप्स ३५ मीटर खरेदीवर जास्तीत जास्त रु.१५ हजार किवा ५० टक्के या पैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करणे आवश्यक आहे.

पंपसंच

वैयक्तिक शेतकरी वापरासाठी विहीर /शेततळे पाण्याच्या स्त्रोतातून पाणी उपसा करण्यासाठी विहिरी व शेततळे करिता बसवलेले पंपसंचाला 10 हजार रु किवा ५० टक्के या पैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करणे आवश्यक आहे.

मनुष्यचलित बीजप्रक्रिया ड्रम किंवा यंत्र

वैयक्तिक शेतकरी / शेतकरी गटा करिता बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मनुष्यचलित बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र खरेदीसाठी 8 हजार रुपये प्रति युनिट किंवा किमतीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. शेतकरी गटासाठी बीज प्रक्रिया ड्रम किंवा यंत्र या बाबीची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावयाची असल्याने या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

मनुष्यचलित टोकन यंत्र / मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील

गळीतधान्य पिकाच्या पेरणीत सुलभता आणण्यासाठी व बियाण्याची बचत करण्याच्या हेतूने मनुष्यचलित टोकन यंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील यांचा अभियानातंर्गत समावेश करण्यात आला आहे. वैयक्तिक शेतकरी किंवा गट हे याबाबिच्या अनुदानासाठी पात्र राहतील. मनुष्यचलित टोकन यंत्र खरेदीसाठी १० हजार रुपये प्रति यंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील खरेदीसाठी ५ हजार रुपये प्रती यंत्र किंवा किमतीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. याबाबीची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपभियान (SMAM) मार्गदर्शक सूचनांनुसार करावी. यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी / गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

छोटे तेलघाणी सयंत्र

राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) उत्पादित मालाच्या मूल्यवृद्धीसाठी छोटे तेलघाणी सयंत्र याबाबीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. छोटे तेलघानी सयंत्रनासाठी कृषि यांत्रिकीकरण उपभियान (SMAM) अंतर्गत घटक क्र.३ बाबीखाली (कृषि यंत्र औजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य) नमूद केल्या प्रमाणे अ.जा. / अ.ज. / अल्प, अत्यल्प व महिला शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ६० टक्के किंवा रुपये १ लाख ८० हजार यापैकी जे कमी असेल ते व इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या ५० टक्के किंवा रुपये १ लाख ५० हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. 

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार CIPHET, लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या Mini Oil Mill / Oil Expeller ची उत्पादक निहाय तेल घाना मोडेलला सदरील अनुदान अनुज्ञेय राहील. यासाठी उपरोल्लेखित केल्याप्रमाणे MAHADBT प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी / गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.


#mahadbtfarmerschemes