Recent Post

Popular Posts

१५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींचा पीकविमा मंजूर | Kharip Pikvima 2025 Wardha

१५ हजार शेतकऱ्यांना १२ कोटींचा पीकविमा मंजूर 

Kharip Pikvima 2025 Wardha

खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

वर्धा जिल्ह्यातील पिक विमा भरलेल्या 62000 शेतकऱ्यापैकी १५३०५ शेतकऱ्यांना 12 कोटी 14 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.


खरीप हंगाम 2025 मध्ये वर्धा जिल्ह्यातील कापूस तूर सोयाबीन व इतर पिकासाठी पिक विमा भरलेल्या 62 हजार 664 शेतकऱ्यापैकी १५३०५ शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

एकंदरीत वर्धा जिल्ह्यातील 29 हजार 782 शेतकऱ्यांनी कापूस पिकाकरिता, 8533 शेतकऱ्यांनी तुर पिकाकरिता, तर 24182 शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकरता आपला पिक विमा काढला होता. सोयाबीन पिकाचा पिक विमा काढलेल्या 24,182 शेतकऱ्यांपैकी 15305 शेतकऱ्यांना हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

वर्धा जिल्ह्यातील एकूण 55 महसूल मंडळापैकी 37 महसूल मंडळामध्ये हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला असून पाच महसूल मंडळामध्ये पिक विमा नामंजूर करण्यात आलेला असून 13 महसूल मंडळामध्ये पीक विम्याच्या नुकसानीची परिगणना सुरू आहे.

मंजूर झालेल्या पीक विम्यामध्ये आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडळातील १४३७ शेतकऱ्यांना, आष्टी तालुक्यातील एक महसूल मंडळातील 310 शेतकऱ्यांना, देवळी तालुक्यातील पाच महसूल मंडळातील 3585 शेतकऱ्यांना हिंगणघाट तालुक्यातील ७ महसूल मंडळातील 2908 शेतकऱ्यांना, समुद्रपूर तालुक्यातील ७ महसूल मंडळातील 3129 शेतकऱ्यांना तर सेलू तालुक्यातील ५ महसूल मंडळातील 2041 वर्धा तालुक्यातील ६ महसूल मंडळातील १८९४ शेतकऱ्यांना हा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

कारंजा व आष्टी तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि वर्धा तालुक्यातील एक अशा पाच महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकाकरता पिक विमा लागू झालेला नाही.