वर्ग 2 जमीन धारकांना मोठा दिलासा; राज्य शासनाचा मोठा निर्णय | Varg 2 jamin new GR

वर्ग 2 जमीन धारकांना मोठा दिलासा; राज्य शासनाचा मोठा निर्णय.

राज्यातील १ लाख ९ हजार ८६८ शेतकऱ्यांना होणार फायदा

Varg 2 jamin new GR

राज्यात महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणा कमाल मर्यादा अधिनियम 1961 च्या कलम 21 नुसार अतिरिक्त ठरवून शासनास जमा करण्यात आलेल्या जमिनी या भूमीहीन लाभार्थ्यांना, माजी सैनिकांना किंवा इतर दुर्बल घटकांना, अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना शेती करण्यासाठी वर्ग २ अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या आहेत.

या 40-50 वर्षांपूर्वी वाटप करण्यात आलेल्या जमिनी जर त्या शेतकऱ्यांना शेतीच्या व्यतिरिक्त कोणत्या वापरासाठी असतील, बिगर शेती वापर असेल तर तो करता नाही.

अशा जमिनीचा हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन त्यासाठी 50 ते 75 टक्के नजरांना भरावा लागत होता, मात्र हा नजराणा रक्कम जास्त असल्यामुळे हे लाभार्थी या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरित करत नव्हते.


परिणामी जमिनी वर्ग २ मध्येच राहत होत्या आणि याच अडचणी लक्षात घेऊन २२ एप्रिल २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळाने भोगवठादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 करणे नियम 2026 ला मंजुरी दिली आहे.

भोगवटादार वर्ग-२ चे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरण या नवीन नियमांतर्गत जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरण करताना दोन प्रकारात वर्गीकरण केले आहे.

वाटपानंतर हस्तांतरण न केलेल्या जमिनींसाठी रेडिरेकनर नुसार (वार्षिक दर विवरणाप्रमाणे परिगणना) किंमतीच्या शहरी भागासाठी ३० टक्के आणि ग्रामीण भागासाठी २५ टक्के.

वाटपानंतर हस्तांतरण झालेल्या, वापरात बदल झालेल्या जमिनींसाठी रेडिरेकनच्या किंमतीनुसार शहरी भागात येणाऱ्या जमिनींकरिता शेती वापरासाठी ३० टक्के, बिगर शेतीसाठी २५ टक्के आणि ग्रामीण भागातील जमिनीसाठी शेती वापरासाठीच्या २५ टक्के आणि बिगर शेती वापरासाठी २० टक्के दराने अधिमुल्य आकारले जाणार आहे.

रेडिरेकनर नुसार निर्धारित केलेल्या जमिनीचे बाजारमूल्य पन्नास लाखापर्यंत रक्कम असेल अशी प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर मान्यतेस्तव ठेवता येणार आहेत. तर पन्नास लाखांपेक्षा अधिक मूल्यांकन असलेल्या प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी यांना शासनाची मान्यता घ्यावी लागणार आहे.

या निर्णयाचा राज्यातील 1लाख 9 हजार 868 शेतकऱ्यांना होणार असून आत्तापर्यंत वाटप करण्यात आलेल्या 1 लाख 73 हजार 560 हेक्टर जमिनी या वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरण करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map