वर्ग 2 जमीन धारकांना मोठा दिलासा; राज्य शासनाचा मोठा निर्णय | Varg 2 jamin new GR
वर्ग 2 जमीन धारकांना मोठा दिलासा; राज्य शासनाचा मोठा निर्णय. राज्यातील १ लाख ९ हजार ८६८ शेतकऱ्यांना होणार फायदा Varg 2 jamin new GR राज्यात महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणा कमाल मर्यादा अधिनियम 1961 च्या कलम 21 नुसार अतिरिक्त ठरवून शासनास जमा करण्यात आलेल्या जमिनी या भूमीहीन लाभार्थ्यांना, माजी सैनिकांना किंवा इतर दुर्बल घटकांना, अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना शेती करण्यासाठी वर्ग २ अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या आहेत. या 40-50 वर्षांपूर्वी वाटप करण्यात आलेल्या जमिनी जर त्या शेतकऱ्यांना शेतीच्या व्यतिरिक्त कोणत्या वापरासाठी असतील, बिगर शेती वापर असेल तर तो करता नाही. अशा जमिनीचा हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन त्यासाठी 50 ते 75 टक्के नजरांना भरावा लागत होता, मात्र हा नजराणा रक्कम जास्त असल्यामुळे हे लाभार्थी या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरित करत नव्हते. परिणामी जमिनी वर्ग २ मध्येच राहत होत्या आणि याच अडचणी लक्षात घेऊन २२ एप्रिल २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळाने भोगवठादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 करणे नियम 2026 ला मंजुरी दिली आहे. भोगव...