Recent Post

Popular Posts

अर्थसंकल्पीय अधिवेशनात २७ कायदे पास || Maharashtra Budget Session 2026

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 27 कायदे पास

Maharashtra Budget Session 2026

राज्यात पार पडलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 29 विधेयकांपैकी 27 विधेयके दोन्ही सभागृहात संमत करण्यात आली आहेत, तर 1 विधेयक मागे घेण्यात आले असून 1 विधेयक विधानपरिषदेत प्रलंबित राहिले आहे. 

या विधेयकामध्ये नगरविकास, ग्रामविकास, शिक्षण, महसूल, वित्त, कायदा व सुव्यवस्था, उद्योग व सहकार अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.

संमत करण्यात आलेली विधेयक खालील प्रमाणे आहेत - विधेयकांची संपूर्ण यादी

१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2026

२) महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2026

३) महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2026

४) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, 2026 (सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 14 याचे रूपांतरित विधेयक)

५) महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक, 2025

६) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2026 (सन 2026 चा अध्यादेश क्रमांक 1 याचे रूपांतरित विधेयक)

७) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, 2026

८) महाराष्ट्र विनाअनुदानित व्यावसायिक शिक्षण संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) विधेयक, 2026

९) महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2026

१०) महाराष्ट्र उद्वाहक व सरकते जिने (सुधारणा) विधेयक, 2026

११) भागीदारी (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2026

१२)  महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2026

१३)  महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, 2026

१४) महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, 2026

१५)  महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2026

१६)  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, 2026

१७) महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026

१८)  महाराष्ट्र मुद्रांक (दुसरी सुधारणा) विधेयक, 2026

१९)  वन्य जीव (संरक्षण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2026

२०)  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, 2026

२१)  महाराष्ट्र निरसन विधेयक, 2026

२२)  महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (सुधारणा) विधेयक, 2026

२३) भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2026

२४)  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, 2026

२५)  महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक, 2026

२६)  महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2026

२७)  मुंबई महानगरपालिका (भूतलक्षी प्रभावाने सुधारणा, भांडवली मूल्य विषयक नियमांचे पुनर अधिनियम आणि विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2026

मागे घेण्यात आलेले विधेयक

1) महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (सुधारणा) विधेयक, 2025

विधानपरिषदेत प्रलंबित विधेयक

1) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2026