अर्थसंकल्पीय अधिवेशनात २७ कायदे पास || Maharashtra Budget Session 2026
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 27 कायदे पास Maharashtra Budget Session 2026 राज्यात पार पडलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 29 विधेयकांपैकी 27 विधेयके दोन्ही सभागृहात संमत करण्यात आली आहेत, तर 1 विधेयक मागे घेण्यात आले असून 1 विधेयक विधानपरिषदेत प्रलंबित राहिले आहे. या विधेयकामध्ये नगरविकास, ग्रामविकास, शिक्षण, महसूल, वित्त, कायदा व सुव्यवस्था, उद्योग व सहकार अशा विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. संमत करण्यात आलेली विधेयक खालील प्रमाणे आहेत - विधेयकांची संपूर्ण यादी १) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2026 २) महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2026 ३) महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2026 ४) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, 2026 (सन 2025 चा अध्यादेश क्रमांक 14 याचे रूपांतरित विधेयक) ५) महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक, 2025 ६) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) ...