खुशखबर! पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी || Cent Govt Excise Duty Cut on Petrol Diesel
खुशखबर! पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी; सर्वसामान्यांना दिलासा Cent Govt Excise Duty Cut on Petrol Diesel सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. शासनाच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलवरील आकारले जाणार उत्पादन शुल्क कमी करण्याचा/ माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकंदरीत सध्या देशात तेल उत्पादक कंपन्यांना पेट्रोल वरती आकारला जाणार उत्पादन शुल्क हे प्रति लिटर १३ रुपये एवढे आहे तर डिझेल वर आकारले जाणारे उत्पादन शुल्क प्रति लिटर १० रुपये इतके आहे. नव्या अधिसूचनेनुसार पेट्रोल वरील उत्पादन शुल्कात तीन रुपयाची घट केल्याने पेट्रोल वरती आकारला जाणारा उत्पादन शुल्क हे दहा रुपये एवढं करण्यात आलेले आहे. तर डिझेल वरील उत्पादन शुल्क पूर्ण पने म्हणजे १० रुपयांनी कमी करण्यात आले आहे. यामुळे तेल उत्पादक कंपन्यांना कुठेतरी मोठा दिलासा मिळणार आहे. एकंदरीत खाजगी कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन करतात. एकंदरीत कच्च्या तेलाचे ...