सावित्रीबाई फुले आधार सह स्वयंम योजनेचे अर्ज सुरू || Swayam Scheme MahaDBT
सावित्रीबाई फुले आधार सह स्वयंम योजनेचे अर्ज सुरू
Swayam Scheme MahaDBT
सावित्रीबाई फुले आधार आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आणि वसतिगृह प्रवेशास पात्र असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थी जिथे शैक्षणिक संस्था आहे त्या शहराचा रहिवाशी नसावा.
विद्यार्थ्याने बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेतलेले असावे आणि बारावीत किमान 60 टक्के गुण असावेत.
इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजना व धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजनेतंर्गत १० मार्च, २०२६ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने या संकेतस्थळावर https://hmas.mahait.org अर्ज भरावे.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी, तर इतर पात्र विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यांनी केले आहे.