सावित्रीबाई फुले आधार सह स्वयंम योजनेचे अर्ज सुरू || Swayam Scheme MahaDBT
सावित्रीबाई फुले आधार सह स्वयंम योजनेचे अर्ज सुरू Swayam Scheme MahaDBT सावित्रीबाई फुले आधार आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या, परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 साठी सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. महसुली विभाग शहर आणि क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी 43 हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना 38 हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आणि वसतिगृह प्रवेशास पात्र असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असून पालकांचे वार्षि...