अतिवृष्टी बाधित भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी; राज्यात PDNA सुरू

अतिवृष्टी बाधित भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी; राज्यात PDNA सुरू

POST Diaster Need Assessment 2026

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी २०२५ मधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक केंद्रीय पथक प्रमुख श्री.सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आज दाखल झाले.

या पथकाने बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी व ग्रामस्थांच्या वेदना जाणून घेतल्या व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी केली.

भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) गावाजवळ श्री.सी.पी.मोहन यांनी भारत मोरे,चंद्रकांत मोरे व अमरसिंह ढगे यांच्या शेतीची पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.bपाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पिके, शेतीजमीन आणि बांधबंदिस्तीचे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

चिंचपूर येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे तसेच वालवड येथील पाझर तलावाचे पुरामुळे झालेले नुकसान, बेलगाव येथील विश्वनाथ दातखिळे यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या १८ गाई पुरात मृत्युमुखी पडल्या,तर २० बकऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.जनावरांचा चारा,दूध काढण्याची मशीन,गोठा,शेणखत व कडबा कटर या नुकसानीची पाहणी केली.

परंडा तालुक्यातील आवार पिंपरी गावाजवळून वाहणाऱ्या उल्फा नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शाळा,अंगणवाडी इमारत व ग्रामपंचायतीच्या आरओ प्लांटची पाहणी, तलावातून मासेमारी करणाऱ्या मासेमारी बांधवांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके,शेतीजमीन,पशुधन,रस्ते, सार्वजनिक मालमत्ता तसेच खाजगी मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे पथकास दिली.

आपत्तीपश्चात गरजांच्या मूल्यांकनासाठी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने आज, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली.

केंद्रीय पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर बु. या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली.

करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची, बंधाऱ्याची तसेच पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली जमीन तसेच पिकांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून पथकाने परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थ रफिक शेख यांच्याशी संवाद साधत नुकसानाची सविस्तर माहिती पथकाने जाणून घेतली.

भविष्यात अशी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर पथकाने देवराई येथील सिमेंट नाला बंधाऱ्याची, स्मशानभूमीची तसेच पारेवाडी येथे पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेतली.

शेवगाव तालुक्यातील वरूर बु. येथे पाण्यामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचीही पथकाने पाहणी करत नुकसानाची माहिती जाणून घेतली.

हे तज्ज्ञ पथक राज्यातील विविध क्षेत्रातील नुकसानीचा सखोल आढावा घेऊन सविस्तर PDNA अहवाल तयार करणार असून तो केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना त्यामुळे दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map