पोस्ट्स

Ativrushti nuksan 2025 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अतिवृष्टी बाधित भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी; राज्यात PDNA सुरू

इमेज
अतिवृष्टी बाधित भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी; राज्यात PDNA सुरू POST Diaster Need Assessment 2026 पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी २०२५ मधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक केंद्रीय पथक प्रमुख श्री.सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आज दाखल झाले. या पथकाने बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी व ग्रामस्थांच्या वेदना जाणून घेतल्या व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी केली. भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) गावाजवळ श्री.सी.पी.मोहन यांनी भारत मोरे,चंद्रकांत मोरे व अमरसिंह ढगे यांच्या शेतीची पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.bपाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पिके, शेतीजमीन आणि बांधबंदिस्तीचे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. चिंचपूर येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे तसेच वालवड येथील पाझर तलावाचे पुर...

अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांतील १४ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित | Ativrushti nuksan 2025

इमेज
अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांतील १४ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित Ativrushti nuksan 2025 गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.  शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. सर्वाधिक बाधित जिल्हे : नांदेड – ६,२...