पोस्ट्स

bachat gat लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आता राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट || Mahila Bachat Gat

इमेज
आता ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट Mahila Bachat Gat  राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून शंभर टक्के स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अशोक उईके यांनी दिली. या योजनेच्या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली असून संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’  योजनेच्या आढावा बैठकीला आदिवासी विकास विभगाचे सचिव विजय वाघमारे, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या व्यवस्थापकीय संचालक नंदिनी आवडे तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) उपसंचालक श्वेता पालवे, राज्य अभियान व्यवस्थापक रामदास धुमाळे आदी अधिकारी उपस्थित होते. आदिवासी महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीत सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा ‘राणी दुर्गावती आ...