उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना || Govt Hostel Scheme

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना 

Govt Hostel Scheme 

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू झालेली आहे.


वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन तसेच निवास व्यवस्था व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते.

इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थीनीनी यांनी जिल्हयामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या बारावी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्यत्तुर अभ्यासक्रमास असणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 या वर्षांसाठी शासकीय वसतिगृह योजनेचे ऑनलाईन पध्दतीने सदर अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १० मार्च, २०२६ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक यांनी केले आहे.


  1. वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. 
  1. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र.
  1. जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
  1. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्‍पन्‍न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्‍त नसावे. 
  1. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली  शैक्षणिक संस्था शहराच्या तथा  तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा. 
  1. विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.  
  1. विद्यार्थ्यांने इयत्ता बारावीमध्ये ६० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

3.55 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi