Bhandhkam Kamgar Kit Vatap आता बांधकाम कामगारांना किट वाटप तालुका स्तरावर

बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दिले जाणे साहित्य तालुकास्तरावर वाटपाचे आदेश.

Bhandhkam Kamgar Kit Vatap


📍गर्दी, कायदा व सुव्यव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

📍आता एका दिवशी 500 बांधकाम कामगारांना वाटप करण्याचे निर्देश


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत जीवित (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी व सुरक्षा संच आणि अत्यावश्यक साहित्याचे वाटप केले जात आहे. हे वाटप केले जात असताना जिल्हा स्तरावर कॅम्प लावले जात आहेत.

मात्र याच्यामुळे वेगवेगळ्या तालुक्यातून या बांधकाम कामगारांना मोठा प्रवास व खर्च करून या कॅम्प वरती याव लागत आहे. यास्तव या साहित्याचे वाटप तालुकास्तरावर करावे असे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून इतर तालुक्यातील कामगारांची गैरसोय होणार नाही व गर्दी टळेल. 

कॅम्प वर होणारी मोठी गर्दी यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे यामुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थाअबाधित राहील याची दक्षता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

कामगारअधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पुसद व दारव्हा येथे गृहपयोगी व सुरक्षा संच तसेच अत्यावश्यक साहित्याचे वाटप सुरू होते. मात्र, या वाटपावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हे वाटप तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.



बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदीत जिवीत (सक्रीय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप कंत्राटदारामार्फत मंगळवारी दि.10 फेब्रुवारी रोजी शेलु बुद्रुक, ता. पुसद व शंकर जिनिंग अॅण्ड प्रेसिंग, जुना दिग्रसरोड, दारव्हा येथे सुरु करण्यात आले होते. 

यवतमाळ जिल्ह्यात एकूण 16 तालुके असून वणी व झरी जामणी हे तालुके या वाटपाच्या ठिकाणापासून सुमारे 210 किलोमीटर अंतरावर आहे. त्या तालुक्यातील कामगारांना वाटपाच्या ठिकाणी येऊन गृहपयोगी संच, सुरक्षा संच व अत्यावश्यक संच घेऊन जाणे सुरक्षेच्या दृष्टीने सोईचे होत नाही.

दि. 10 फेब्रुवारी रोजी वाटपाच्या ठिकाणी सुमारे 3 हजारच्या आसपास किट वाटप करण्याबाबत ऑनलाईन अपॉईमेंट देण्यात आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी किंवा गोंधळ झाला असता,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. 

बुधवारी दि. 11 फेब्रुवारी रोजीसुध्दा कामगारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणझाला. त्यामुळे हे वाटप तात्काळ बंद करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मंडळाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

तसेच यापुढील काळात होणारे वाटप तालुकास्तरावर करुन एका दिवशी जास्तीत जास्त 500 बांधकाम कामगारांना वाटप करण्यात यावे. त्याठिकाणी सोयीसुविधा असाव्यात. या वाटपापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी घेण्यात यावी, अशा सक्त सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map