Bhandhkam Kamgar Kit Vatap आता बांधकाम कामगारांना किट वाटप तालुका स्तरावर
बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दिले जाणे साहित्य तालुकास्तरावर वाटपाचे आदेश. Bhandhkam Kamgar Kit Vatap 📍गर्दी, कायदा व सुव्यव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय 📍आता एका दिवशी 500 बांधकाम कामगारांना वाटप करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत जीवित (सक्रिय) बांधकाम कामगारांना गृहपयोगी व सुरक्षा संच आणि अत्यावश्यक साहित्याचे वाटप केले जात आहे. हे वाटप केले जात असताना जिल्हा स्तरावर कॅम्प लावले जात आहेत. मात्र याच्यामुळे वेगवेगळ्या तालुक्यातून या बांधकाम कामगारांना मोठा प्रवास व खर्च करून या कॅम्प वरती याव लागत आहे. यास्तव या साहित्याचे वाटप तालुकास्तरावर करावे असे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून इतर तालुक्यातील कामगारांची गैरसोय होणार नाही व गर्दी टळेल. कॅम्प वर होणारी मोठी गर्दी यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे यामुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थाअबाधित राहील याची दक्षता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारअधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानु...