7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी; GR आला || Election Maharashtra 2026

7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी; GR आला 

Election Maharashtra 2026

राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.



या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.

GR येथे पहा.

दि. 07 फेब्रुवारी, 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 करिता मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.


सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये 
रायगड (पंचायत समित्या – पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड. रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर)

रत्नागिरी (मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर) 

सिंधुदुर्ग (वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग)

पुणे (जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर)

सातारा (खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड)

सांगली (आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज)

सोलापूर (करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट)

कोल्हापूर (शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड)

छत्रपती संभाजीनगर (सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण)

परभणी (जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड)

धाराशीव (परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा, उमरगा) 

लातूर (पंचायत समित्या – अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर (अनंतपाळ), देवणी, औसा, निलंगा) यांचा समावेश आहे.