कांदा चाळ अनुदान योजना अटी शर्ती , पात्रता, अनुदान, कागदपत्र माहिती.
kanda chal anudan yojana
कांदा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते.
महाराष्ट्रात कांदा हे एक महत्वाचे पीकआहे. महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड हि मुख्यत्वे नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव , उस्मानाबाद व धुळे या जिल्ह्यात केली जाते.
कांदा हा नाशिवंत असल्याने कांदा दिर्घकाळ टिकविणे शक्य होत नाही यासाठी कांदा चाळीच्या माध्यमातून साठवणूक करणे आवश्यक असते.
योजनेचे उद्दिष्ट:
* साठवणुकीत कांदा पिकाचे होणारे नुकसान कमी करणे.
* हंगाम नसताना कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे किंवा हंगामात आवक वाढून भाव कोसळणे अशा समस्यांवर नियंत्रण मिळवणे.
अनुदान आणि खर्च मर्यादा:
क्षमतेनुसार अनुदानाच्या सुधारित दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सर्वसाधारण व अनुसूचित क्षेत्राकरिता 5 ते 1 हजार मेट्रीक टन क्षमतेसाठी यथाप्रमाणा आधारे (Pro-rata basis) ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय आहे.
- 5 ते 25 मेट्रीक टन क्षमतेसाठी प्रति मे. टन रुपये 8 हजार ग्राह्य प्रकल्प खर्च असून, कमाल रुपये 4 हजार प्रति मे. टन अर्थसहाय्य मिळेल.
- 25 ते 500 मे. टन क्षमतेसाठी प्रति मे. टन रुपये 7 हजार ग्राह्य खर्च असून, कमाल रुपये 3 हजार 500 प्रति मे. टन अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.
- 500 ते 1000 मे. टन क्षमतेसाठी प्रति मे. टन रुपये 6 हजार ग्राह्य खर्च असून, कमाल रुपये 3 हजार प्रति मे. टन अर्थसहाय्य मिळू शकते .
- प्रकल्प खर्च 30 लाख रुपयांपेक्षा जास्त झाल्यास बँक कर्ज अनिवार्य आहे आणि अर्थसहाय्य बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात (Credit Linked Back Ended Subsidy) दिले जाईल.
पात्रता निकष:
- * शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
- * 7/12 उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे.
- * शेतकऱ्याकडे कांदापिक असणे बंधनकारक आहे.
- * वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह, शेतकरी गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकरी उत्पादक संघ आणि नोंदणीकृत संस्था, सहकारी पणन संघ या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हि कानडा चाळ बनविण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी kanda chal anudan yojana योजना राबविली जाते.
यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे.
वैयक्तिक शेतकऱ्यांना 100 मेट्रिक टना पर्यंत तर सहकारी संस्थांसाठी 500 मॅटिक टनापर्यंत चाल बांधण्याची तरतूद या योजनेत आहे.
- कांदा चाळी साठी अर्ज Maha Dbt Portal वर ऑनलाईन पध्धतीने करावा लागतो.
- इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या अर्ज सादर करावा.
kanda chal anudan yojana विडिओ येथे पहा
- ५ ते ५० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी १ हेक्टर पर्यंत क्षेत्र तर ५० ते १०० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी १ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असावे.
- अर्जदाराच्या नावे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक कांदा पिकाची नोंद असणारा सातबारा उताराची प्रत व ८ अ उतारा हा महाडीबीटी पोर्टल उपलोड करावा लागतो.
- लाभार्थींनी कांदा चाळ बांधण्यापूर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा लागणार आहे. तर (महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन पद्धतीने कांद्याचा अनुदान घेण्यासाठी अर्ज आहे. यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ची सोडत होणार असून. आपल्या कांदा kanda chal anudan yojana साठी आपले कृषी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे आपल्या थेट शेतामध्ये येऊन पाहणी करतील.
- कृषी विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला देखील आपल्याला जोडावा लागणार आहे.
- त्याचबरोबर काम झाल्यानंतर जिओ टॅगिंग ने अर्जदाराचा कांदाचाळी चा फोटो देखील आपल्याला जोडावे लागणार आहे.
- सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.
- 5 ते 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक नमुने खालील प्रमाणे असतात
