राज्यात जून ते ऑक्टोबर कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, महत्वाची बैठक
Ativrushti Anudan 2025
मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मा. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची दुरचित्रवाणी द्वारे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.
📌 बैठकीतील मुख्य विषय : अतिवृष्टी – मदत वाटप, PM Gati Shakti, महासंपत्ती– MHUID
📝 मा. मुख्य सचिव यांनी दिलेले प्रमुख निर्देश :
1️⃣ अतिवृष्टी मदत वाटपासाठी Helpline Activate करणे
— जनतेच्या तक्रारी तत्काळ नोंदवून त्वरित निराकरण करण्याचे निर्देश.
— उर्वरित लाभवाटपाचे काम तातडीने पूर्ण करणे.
2️⃣ Agristack मधील Mismatch Data Correction
— खातेदारांच्या नावातील विसंगती त्वरित दुरुस्त करून प्रणालीतील डेटा 100% अचूक करण्याचे आदेश.
3️⃣ अतिवृष्टी मदत लाभार्थी यादी प्रकाशित करणे
— लाभार्थ्यांची अधिकृत यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर Upload करण्याचे निर्देश.
4️⃣ PM Gati Shakti Portal वर जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प अपलोड करणे
— जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे व प्राधान्य प्रकल्प पोर्टलवर समाविष्ट करावेत, असे स्पष्ट निर्देश.